भारतातील सर्वात स्वच्छ नदी; काचेसारखी पारदर्शक, पाण्यातील मासे, दगडं सगळ आर पार दिसतं

आरशासारखी नदी कधी पाहिलीय का? आरशासारखा तळ असलेली स्वच्छ नदी आपल्या भारतात आहे.   

| Oct 16, 2024, 17:21 PM IST

Umngot River :कल्पनेच्याही पलिकडं स्वच्छ असलेली या नदी आपल्या भारतात आहे. या नदीत कचऱ्याचा एक कपटाही दिसणार नाही. नदीचं पाणी एवढं स्वच्छ आहे की तुम्ही थेट नदीचा तळ पाहू शकता. नदीतील खडक आणि मासेही पाहू शकता. जाणून घेऊया कुठे आहे ही नदी.

1/7

नदीचं नीळशार पाणी तुम्हाला एका वेगळ्याच जगात गेल्याचा स्वर्गीय आनंद देते.

2/7

नदी एवढी स्वच्छ ठेवण्यात गावकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. गावकरी नदी स्वच्छ ठेवतातच शिवाय इथं येणाऱ्या पर्यटकांनाही कचरा करू देत नाही. जे पर्यावरणविषयक नियम मोडतात त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाते. 

3/7

भारतातली सर्वात स्वच्छ नदी अशी ख्याती उमनगोट नदीची आहे.  ही नदी पाहण्यासाठी शेकडो पर्यटक दावकी खेड्यात येतात. उमनगोट मध्ये बोटिंग करतात. तिचं तळ न्याहाळतात.  

4/7

मेघालयमधील जयंतिया जिल्ह्यातल्या दावकी खेड्याजवळून उमनगोट ही नदी वाहते. 

5/7

ही नदी पाहण्यासाठी तुम्हाला पासपोर्टची गरज नाही. किंवा व्हिसाचीही गरज नाही. तुम्हाला ही नदी पाहण्यासाठी फक्त ईशान्येकडच्या राज्यांचा प्रवास करावा लागेल.

6/7

निसर्गानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट किती शुद्ध असते याचा प्रत्येय या नदीच्या पाण्याकडं पाहिल्यावर येतो. प्रदूषित नद्यांच्या भारतात  अशी नदी सापडते हे एक मोठं आश्चर्य आहे.

7/7

 या नदीत कधीतरी ढग, कधीतरी आकाश स्वतःचं प्रतिबिंब न्याहाळून पाहते की काय असं वाटतं. कधी काठावरचे खडक उगाचच नदीत वाकून पाहतात की काय असं वाटतं.