'जुळून येती रेशीम गाठी' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा

Jun 22, 2020, 12:46 PM IST
1/5

'जुळून येती रेशीम गाठी' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा

काही दिवसांपासून कोरोना, कोविड, लॉकडाऊन या साऱ्या वातावरणात कुठेतरी आनंद आणि कौटुंबीक कार्यक्रमांचा अनेकांना विसरच पडला. पण, काही मंडळी मात्र या वातावरणातही त्यांच्या खासगी आयुष्याचा एक वेगळ्याच अध्याय लिहित आहेत. 

2/5

'जुळून येती रेशीम गाठी' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा

अशाच मंडळींमधील एक नाव म्हणजे 'जुळून येतील रेशीम गाठी' या आणि अशा इतरही बऱ्याच मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचं. 

3/5

'जुळून येती रेशीम गाठी' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा

शर्मिष्ठानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो खास असण्याचं कारणही तसंच आहे. कारण, शर्मिष्ठानं तिच्या खासगी आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. 

4/5

'जुळून येती रेशीम गाठी' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा

तेजस देसाई याच्यासह तिचा साखरपुडा समारंभ पार पडला आहे. हीट गोड बातमी काही सुरेख फोटो आणि तितक्याच सुरेख कॅप्शनसह तिनं पोस्ट केली आहे. 

5/5

'जुळून येती रेशीम गाठी' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा

तुझ्यासवे उर्वरित आयुष्याचा हा प्रवास मला करायचा आहे, असं लिहित तिनं आपल्या जोडीदाराशी सर्वांचीच ओळख करुन दिली. सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी मोठ्या संख्येनं कमेंट्स करत या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. (सर्व छायाचित्रे- इन्स्टाग्राम)