Saving Plan मधून मिळतात हे अनेक फायदे, या बचत योजनेत गुंतवून करुन मिळवा जास्त रिटर्न

.Investment Tips : अनेकांना बचत करण्याची सवय असते. ही सवय कधीही चांगली असते. जे बचत करण्याचा विचार करतात. मात्र, त्यांना गुंतवणूक करता येत नाही. त्यांसाठी या काही चांगल्या योजना आहे. यात बचत केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

Surendra Gangan | May 02, 2023, 07:42 AM IST

.

1/5

Investment : बचत योजना  (Saving Plan) या गुंतवणुकीसाठी चांगेले साधन आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या बचत योजना दिल्या जातात. अशा परिस्थितीत, बचत योजनेचा अभ्यास करुन गुंतवणूक केल्यास भविष्यासाठी चांगले असते. बचत योजना ही आर्थिक उत्पादने आहेत जी शिस्तबद्ध बचत सक्षम करण्यासाठी, स्थिर परतावा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे, जी तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात. ते प्रामुख्याने जीवन विमा उत्पादन असल्याने, या योजना तुम्हाला काही घडल्यास तुमच्या नातेवाईकांना आर्थिक सुरक्षितता देते. बचत  आज आम्ही तुम्हाला काही बचत योजनेच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत.

2/5

मॅच्युरिटी बेनिफिट - बचत योजना या निश्चित मुदतीसाठी असतात. असे असले तरी त्याचे खूप लाभ आहेत. यामुळे तुमच्या बचतीवर निश्चित व्याज मिळते. काही सर्वोत्कृष्ट बचत योजनांमध्ये खात्रीशीर जोड आणि बोनस देखील मिळतो.  

3/5

स्थिर परतावा - काही योजना अशा आहेत की त्या स्थिर परतावा देतात. बचत योजना स्थिर आणि सुरक्षित जास्त देत असतात. त्यामुळे यात गुंतवणूक करणे योग्य ठरते. याचा अर्थ तुम्ही पॉलिसीच्या प्रारंभी तुम्हाला दिलेले पैसे गमावणार नाहीत, जर तुम्ही सर्व प्रीमियम वेळेवर भरले तर त्याचा भविष्यात चांगला लाभ मिळतो आणि फायदा होतो.

4/5

लवचिक प्रीमियम पेमेंट- बचत योजना तुम्हाला तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरण्याची परवानगी देतात. या प्रकरणात, तुम्ही त्यानुसार प्रीमियम भरु शकता.

5/5

Life Insurance - ही एक चांगली बचत योजना आहे. यात तुम्हाला लाइफ कव्हर मिळते. तुमच्यासोबत काही दुर्दैवी घडल्यास तुमच्या कुंटुंबीयांना आर्थिक सुरक्षा मिळते. अशा परिस्थितीत याचा तुमच्या कुटुंबालाही फायदा होतो.