महाराष्ट्रात आहे दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच किल्ला! रोप बांधल्याशिवाय ट्रेकर चढाई करुच शकत नाहीत

Moroshicha Bhairavgad Fort in Maharashtra : महाराष्ट्राला किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. सह्यद्री पर्वत रांगांच्या कुशीत अनेक भव्य किल्ले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कठिण किल्यांपैकी एक आहे तो माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला. हा किल्ला दिबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच असल्याचा दावा केला जात आहे. येथे जाणारे ट्रेकर्स  जीव धोक्यात घालून  ट्रेगिंक करतात.

Feb 14, 2025, 11:43 AM IST
1/8

उंच डोंगरात असलेले किल्ले पाहून धडकी भरते. महाराष्ट्रात एक असा किल्ला आहे जो  दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच असल्याचा दावा केला जातो.   

2/8

मुंबई - कल्याण - मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या पायथ्याचे मोरोशी गावा पोहचल्यावर दूरुनच हा उंच किल्ला नजरेस पडतो. 

3/8

किल्ल्यावर चढाई करताना कातळात खोदलेली आयताकृती गुहा लागते. या गुहेत जाण्यासाठी सुध्दा गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. गुहेच्या पुढील पायर्‍या उध्वस्त केलेल्या आहेत. या ठिकाणी दोर लाऊनच वर चढावे लागते.  या पायर्‍यांच्या एका बाजूला कातळकडा व दुसर्‍या बाजूला खोल दरी आहे.  

4/8

भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या 400 फूट उंच, सरळसोट भिंतीवर वसवलेला आहे. 

5/8

सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती"; ही रचना आपल्याला भैरवगडावर पहायला मिळते.

6/8

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे.

7/8

माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे.

8/8

महाराष्ट्रात या सर्वात उंच किल्ल्याचे नाव आहे भैरवगड. रोप बांधल्याशिवाय ट्रेकर  चढाई करुच शकत नाहीत.  किल्ला हा चढाईसाठी अतिशय कठिण किल्ला मानला जातो.