Nitin Gadkari : मोदींचे 'कार्यक्षम मंत्री' ते विजयाची हॅटट्रिक!, कसा आहे नितीन गडकरींचा राजकीय प्रवास?

Nagpur Loksabha Election Nitin Gadkari win : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'कार्यक्षम मंत्री' भाजपचा गड राखला आणि सोबत विजयाची हॅटट्रिक केली. भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला. 

Jun 04, 2024, 19:50 PM IST
1/7

नितीन गडकरी यांना 6 लाख 11 हजार 626 तर विकास ठाकरे यांना 4 लाख 72 हजार 620 मतं पडली. तब्बल 1 लाख 28 हजार 296 मतांच्या फरकाने गडकरी यांनी बाजी मारली. 

2/7

देशभरात महामार्गाचे जाळे निर्माण करणारे गडकरी हे पुलकरी म्हणून ओळखली जातात. तरुणापासूनच त्यांनी संघाशी आपलं नातं जोडलं. आई भानुताई यांचा गडकरींवर प्रभाव होता. 

3/7

बी. कॉमची पदवी घेतल्यावर एलएलबीचे शिक्षण घेतलं. पण त्यांना राजकारणात रस होता. विद्यार्थी असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्या झाले. 

4/7

तर वयाच्या 24 व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरचे अध्यक्ष झाले. आणीबाणीतही त्यांनी मोलाची जबाबदारी उचलली. त्यानंतर ते नागपूर शहराचे भाजप सचिव झाले. 

5/7

त्यानंतर राजकारणाचा प्रवास जोर धरला. 1989 मध्ये ते विधान परिषदेचे आमदार आले. त्यानंतर 20 वर्ष ते विधान परिषदेचे सदस्य राहिले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही भूषवले. 

6/7

त्यानंतर ते आधी महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष आणि नंतर 2009 ते 2013 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 

7/7

1995 ते 1999 मध्ये त्यांनी राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून उल्लेखनीय काम केलंय. सध्या ते मोदी मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत.