तिहेरी लढतीने राज्यात निवडणुकीचं वातावरण तापलं, 'या' मतदारसंघात रंगणार बिग फाईट

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापतंय. काही पक्षांनी उमेदवारांची पहिली घोषणा केलीय.  महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असली तरी मनसेने स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याने चुरस निर्माण केलीय. मनसेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महायुती आणि महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलं आहे. 

राजीव कासले | Oct 23, 2024, 16:04 PM IST
1/6

तिहेरी लढतीने राज्यात निवडणुकीचं वातावरण तापलं, 'या' मतदारसंघात रंगणार बिग फाईट

2/6

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते मुंबईच्या माहिम मतदारसंघाकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे मनसेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. शिंदेंच्या शिवसेनेने आमदार सदा सरवणकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

3/6

मुख्यमंत्र्याचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपला जागा मिळाली आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी ही जागा मिळवली आहे. तर त्यांच्याविरोधात मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या अविनाश जाधव यांना तिकिट देण्यात आली आहे. मविआने इथून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.  

4/6

बेलापूर मतदारसंघातही भाजपने आमदार मंदा म्हात्रे यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवल आहे. मंदा म्हात्रे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाल्यात. तर मनसेकडून गजानन काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

5/6

पुण्यातल्या कोथरुड मतदारसंघातही भाजप आणि मनसे आमने सामने आहेत. महाविकास आघाडीने अद्याप आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. भाजपाकडून चंद्रकांत पाटील तर मनसेकडून किशोर शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

6/6

महाविकास आघाडीने उमेदवार यादी जाहीर केलेली नसली तरी वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. तर या मतदारसंघातून मनसेच्या संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर महायुतीने अद्याप आपला उमेदवारी जाहीर केलेला नाही.