सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तुम्हीही येत्या आठवड्यातील मोठी सुट्टी पाहता कुठेतरी भटकण्यासाठी निघणार आहात का? रेल्वेतर्फे काही कामांच्या धर्तीवर महत्त्वाच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. एकदा वाहतुकीच्या पर्यायी मार्गांची पाहणी करा आणि सोयीनुसारच बाहेर पडा.
1/8
Indian Railway
2/8
पूर्वसूचना
3/8
रेल्वेकडून ब्लॉक
प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार भुसावळ- जळगाव विभागामध्ये रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार असून, काही महत्त्वाची कामं पूर्ण केली जाणार आहेत. ज्याअंतर्गत 12 आणि 14 ऑगस्ट रोजी सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (11039), आणि 13 जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (02132), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12114) रद्द करण्यात आली आहे.
4/8
काही गाड्या रद्द
5/8
चार फेऱ्या रद्द
14 ऑगस्टला निघणारी पुणे-जबलपूर (02131), पुणे-नागपूर (12113), पुणे-नागपूर (12113) आणि 15 ऑगस्टसाठीची निर्धारित पुणे-नागपूर एक्स्प्रेस (12135) रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या एकूण चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून यामध्ये शनिवार (कोल्हापूर), सोमवार (गोंदिया)सह, 15 आणि 16 तारखेसाठीच्या रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
6/8
बदललेले वाहतूक मार्ग
7/8