महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पावसाळी हिल स्टेशन; धुक, धबधबा आणि बरचं काही...

लोणावळा खंडाळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे. 

वनिता कांबळे | Jun 09, 2024, 23:23 PM IST

Lonavala Tourist Point : महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळ आहेत जे देश विदेशातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. लोणावळा खंडाळा हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. तसेच हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पावसाळी हिल स्टेशन देखील आहे. 

1/7

लोणावळा, खंडाळा हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पावसाळी हिल स्टेशन आहे. 

2/7

लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, लेणी अशी ठिकाणे येथे पाहता येतात. 

3/7

 लोणवळ्यात टायगर पाईंट हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.

4/7

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.  

5/7

 खंडाळ्याच्या घाटातून लाँग ड्राईव्हईची मजा काही वेगळीच. पावळ्यात फिरताना तर येथे स्वर्ग सुखाचा अनुभव येतो.   

6/7

पुणे आणि मुंबई पासून लोणावळा खंडाळा हे हिल स्टेशन अगदी जवळ आहेत. 

7/7

 लोणावळा खंडाळा हे महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर आणि गजबजलेले हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची विशेष गर्दी पहायला मिळते.