क्रॅश डाएट म्हणजे काय? ज्यामुळे अभिनेत्री श्रीदेवी यांना गमवावा लागला जीव

Boney Kapoor opens up on Sridevi’s death : बॉलिवूडची चाँदणी अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांचा 24 फेब्रुवारी 2018 ला मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचं गुढ कायम होतं. आता पाच वर्षांनंतर श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगितलं आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांच्यावरही आरोप झाले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी उलगडा केला आहे. 

राजीव कासले | Oct 02, 2023, 21:43 PM IST
1/7

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला आता पाच वर्ष उलटून गेलीत. त्यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. एका हॉटेलच्या बाथरुम श्रीदेवींचा मृतदेह सापडला होता. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं गुढ कायम होतं.

2/7

आता तब्बल पाच वर्षांनी श्रीदेवी यांचे  पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूच गुढ उलगडलंय. श्रीदेवी यांचा मृत्यू क्रॅश डाएटमुळे झाल्याचा खुलासा बोनी कपूर यांनी केला आहे. 

3/7

आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी श्रीदेवी क्रॅश डाएट करत होत्या. त्यामुळे त्यांना लो बीपीचा त्रास सुरु झाला आणि त्या अचानक बेशुद्ध पडत होत्या असं बोनी कपूर यांनी म्हटलंय.

4/7

ज्यामुळे श्रीदेवी यांचा मृत्यू झाला, तो क्रॅश डाएट कसा असतो, त्याचे फायदे आणि नुकसान जाणून घेणं गरजेचं आहे. झटपट वजन कमी करण्यासाठी काही जणं क्रॅश डाएट फॉलो करतात.

5/7

क्रॅश डाएटमध्ये अगदी कमी कॅलरी असलेल्या फळांचं सेवन केलं जातं. या डाएटमध्ये कार्बोहाइड्रेट असलेले पदार्थ पूर्णपणे खाणं बंद केले जातात. 

6/7

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार क्रॅश डाएट काही दिवसांसाठी केल्यास त्याचे फायदे जाणवतात. पण जास्त कालावधीसाठी फॉलो केल्यास याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. शरीलाला आवश्यक असणारी पोषक तत्व कमी होऊ शकतात.

7/7

क्रॅश डाएट मोठ्या कालावधीसाठी केल्यास शरीरातील मांसपेशी आणि हाडं कमकुवत होऊ शकतात. याशिवाय हेअरफॉल, त्वचा सुखने आणि चक्कर येणं अशा समस्याी जाणवू शकतात.