महाराष्ट्रातील पंचगंगा; पाच नद्यांचा संगम होणारे कोल्हापुरातील सर्वात पवित्र ठिकाण

कोल्हापुरातील पंचगंगा हे पवित्र ठिकाण आहे.  

वनिता कांबळे | Jul 20, 2024, 00:06 AM IST

Kolhapur Panchganga Chikhali : उत्तर प्रदेशात अलाहाबाद येथील गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचा संगम होतो.  महाष्ट्रातील कोल्हापुरात देखील असे पवित्र ठिकाण आहे. कोल्हापुरातील पंचगंगा देखील अलाहाबाद प्रमाणे ‘नंद प्रयाग’ किंवा ‘दक्षिण प्रयाग’ म्हणून ओळखले आहे. 

1/7

कोल्हापूरच्या हद्दीलगत असलेल्या चिखली या गावानजीक पंचगंगेचे उगमस्थान आहे. 

2/7

प्रयाग संगमाच्या काठावर दत्त मंदिर आणि इतर काही लहान अवशेष दिसतात.  

3/7

या ठिकाणाला वैदिक धर्माने व ऋषी मुनींच्या वास्तव्याने महत्त्व प्राप्त झाले होते. भैरवतीर्थ असाही याचा उल्लेख येतो. 

4/7

तपसाधनेने ज्ञानी झालेल्या व धर्म शास्त्र रचणाऱ्या स्वयंभू मुनींचा मन्वाश्रम आहे, तर कपिलतीर्थ हे प्रयागच्या दक्षिणेस व शुक्‍ल तीर्थाच्या उत्तरेस नदीच्या मध्यभागी आहे.  

5/7

प्रयागच्या वायव्येस अर्ध्या कोसावर शुकाश्रम आहे. 

6/7

‘संगमातून’ सुरू झालेला पंचगंगेचा प्रवास पुन्हा कृष्णा नदीच्या ‘संगमात’ संपतो.   

7/7

कासारी आणि भोगावतीसह आलेल्या तुळशी, धामणी, कुंभी अशा पाच नद्या एकत्र येऊन पंचगंगेचा प्रवास इथे सुरू होतो.