Kailash Parvat Secret: विज्ञानाला चॅलेंज देणारा रहस्यमयी कैलास पर्वत! मनुष्य चढाई करुच शकत नाही? अलौकिक शक्तीमुळे भरकटते दिशा
Kailash Parvat Mystery : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणारेय. बीजिंगला भारत-चीन देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये याबाबत चर्चा झाली. 2 दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर सुरू होणारेय. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. कैलास पर्वताची (Kailash Mountain) उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 2 हजार मीटर कमी आहे. असे असताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम अनेकांनी रचला. मात्र, आजवर कोणीही कोणीही कैलास पर्वतावर चढाई का करु शकले नाहीत? बौद्ध आणि हिंदूधर्मीय कैलास पर्वता अति पवित्र का मानतात.
वनिता कांबळे
| Jan 29, 2025, 17:41 PM IST
1/7
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणारेय. अनेकांनी कैलास पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथे चढाई करताना नेव्हिगेशन करणे खूप अवघड होते. कारण दिशा भरकटते, रस्ता चुकतो. येथे असलेल्या अलौकिक शक्तीमुळे येथे दिशानिर्देश बदलत असल्याचा दावा येथे चढाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी केला आहे. जाणून घेऊया कैलास पर्वताची रहस्ये.
2/7
सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की हा पर्वत एक पवित्र स्थान आहे, म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये. बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा 11 व्या शतकात कैलास पर्वतावर चढाई केली होती. पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता असा दावाही केला जातो.
3/7
कैलास पर्वत अत्यंत किरणोत्सर्गी आहे. पर्वताचा उतार 65 अंशांपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टवर हा उतार 40 ते 60 अंशांपर्यंतचा आहे. यामुळेच गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे येथे हेलीकॉप्टर देखील भरकटतात. कैलास पर्वत सर करताना चुकीच्या दिशेने वळणे आणि दिशाभूल करणाऱ्या पायवाटा लागतात. येथील हवामानात मानवाची प्रकृती बिघडते.
4/7
5/7
6/7