अंबानी कुटुंबाचे आवडते फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट कोण तुम्हाला माहितीयेत का?

अंबानी कुटुंब हे त्यांच्या लग्झरीयस लाइफस्टाईलसाठी ओळखलं जातं. मग अशात त्यांचे आवडते डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि हेयर स्टालिस्ट कोण आहेत. हे तुम्हाला माहित आहेत का? चला तर आज त्या सगळ्यांविषयी जाणून घेऊया...

Diksha Patil | Jun 01, 2024, 19:30 PM IST
1/7

अंबानी कुटुंब

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामुळे संपूर्ण कुटुंब चर्चेत आहे. अंबानी कुटुंब हे दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी लग्झरीयस क्रुझवर गेले आहेत. यावेळी अनेकांनी हजेरी लावली आहे. त्या सगळ्यांसोबत अंबानी कुटुंबाला तयार करण्यासाठी त्यांचे आवडते डिझायनरपासून हेअर स्टायलिस्टपर्यंत सगळे आले आहेत. 

2/7

आवडते डिझायनर

अंबानी कुटुंब त्यांच्या सुन आणि मुलींच्या लुक्सवर लक्ष देतात. नीता अंबानी, राधिका मर्चेंट, श्लोका मेहता आणि ईशा अंबानी यांच्या आवडत्या डिझायनरमध्ये मनीष मल्होत्रा, अबू जानी-संदीप खोसला यांची नावं आहेत. 

3/7

आवडते स्टायलिस्ट

त्यांच्या आवडत्या स्टायलिस्ट विषयी बोलायचे झाले तर अनाइता श्रॉफ अदाजानिया ही टॉप लिस्टमध्ये आहे.   

4/7

राधिकाची आवडती स्टायलिस्ट

राधिकाच्या आवडत्या स्टायलिस्ट विषयी बोलायचं झालं तर तिची पर्सनल स्टायलिस्ट शेरीन आहे. शेरीन ही सोनम कपूर ते करीना कपूरची आवडती स्टायलिस्ट आहे.   

5/7

हेअर स्टायलिस्ट

अंबानी कुटुंबाची आवडती हेअर स्टायलिस्ट ही संगीता हेगडे आहे. ती बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत राधिका मर्चेंटची आवडती आहे. संगीता ही काजोलसोबत गेल्या अनेक वर्षांपासूनसोबत आहे. 

6/7

मेकअप आर्टिस्ट

अंबानी कुटुंबासोबत गेल्या अनेक वर्षांपासून मिक्की कॉन्ट्रॅक्टरसोबत आहे. मिक्की कॉन्ट्रॅक्टर नीता अंबानी आणि ईशा अंबानीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तर मिक्की कॉन्ट्रॅक्टरला बेस्ट मेकअप आर्टिस्टचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. 

7/7

राधिका मर्चेंटची आवडती मेकअप आर्टिस्ट

लवलीन रामचंदानी ही एक मुंबई बेस्ड सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत ती राधिका मर्चेंटची देखील फेवरेट आहे. त्यासोबत ती श्रेया पिळगावकर, नीलम कोठारी, सानिया मिर्जा, विद्या बालन, अनन्या बिरला ते निम्रत कौर सारख्या अभिनेत्री आहेत.