Kerala Wayanad Landslide :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पृथ्वीवरील स्वर्ग असलेले सुंदर गाव 'असं' गेलं जमिनीच्या पोटात

Kerala Wayanad Landslide Before And After Photos : पावसाळ्यात केरळ निसर्ग जणू स्वर्गाचा आनंद देतात. पावसाळ्यात निसर्ग, धबधब्यांचे सौंदर्य आणि धुक्यांची मजा घेण्यासाठी असंख्य पर्यटक जात असतात. केरळमधील वायनाड हे धबधब्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण...पण मंगळवारी पहाटे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. स्वर्गाहून सुंदर हे गाव क्षणात भूस्खलनामुळे वाहून गेलं. 

| Jul 30, 2024, 12:48 PM IST
1/11

केरळमधील वायनाडमध्ये तीन भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्याची जबाबदारी लष्कराने घेतली आहे. परिसरातील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

2/11

तीन भूस्खलनामुळे पाणी आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली केरळ वायनाडमधील चार गावावर महासंकट कोसळलंय. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामला आणि नूलपुझा गावांना सर्वाधिक फटका बसलाय. 

3/11

या दुर्घटनेत एक गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून वाहून गेले आहे. मुंडक्काई गावातील अनेक घरे, दुकाने आणि वाहने ढिगाऱ्याखाली दबली आहेत. 

4/11

भूस्खलनाने गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाशाच्या खुणा सोडल्या आहेत. मुंडक्काई, चुरलमळा, अट्टमळा आणि नूलपुझा या गावांचे चित्र बदलले असून त्यांचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. 

5/11

पुराच्या पाण्यात वाहून गेलेली वाहने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या अडकून इकडे-तिकडे पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे.

6/11

डोंगरावरून खाली लोटणारे मोठमोठे दगड बचाव कर्मचाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत. बचाव कार्यात गुंतलेले लोक मुसळधार पावसात मृतदेह आणि जखमींना रुग्णवाहिकांमध्ये घेऊन जात आहेत. 

7/11

भूस्खलनाच्या घटनांमुळे झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली आहेत आणि पुराच्या पाण्यामुळे हिरवेगार भाग नष्ट झालंय. 

8/11

असंख्य संसार उद्ध्वस्त, सर्वत्र आक्रोश, नातेवाईकांचा शोध आणि बचावकार्य अस काहीशी चित्र या गावांमध्ये दिसत आहेत. 

9/11

केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन आणि पावसामुळे चुरमला भागात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 

10/11

शोध आणि बचाव कार्यासाठी लष्कराचे एक पथक कन्नूरहून भूस्खलनग्रस्त वायनाडला दाखल झालंय. 

11/11

IMD ने केरळमधील चार जिल्ह्यांसाठी कोझिकोड, मलप्पुरम, वायनाड आणि कासारगोड रेड अलर्ट जारी केला. तर पठानमथिट्टा, अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय.