तुमच्या पोटात नेहमी गॅस होऊन गुडगुड आवाज येतो? मग हे 7 पदार्थ खाऊन बघाच

अनेकदा चुकीच्या जीवनशैलीमुळे, आहारामुळे पचना संबंधीत त्रास होतात. सहसा पोटात गॅस आम्लपित्त किंवा जड अन्नामुळे होते. काही वेळा आपण आपला आहार बदलण्याची गरज आहे यासाठी हा संकेतही असू शकतो.

Sep 01, 2024, 20:00 PM IST

जड पदार्थ म्हणजे तळलेले, मसालेदार किंवा अत्यंत गोड पदार्थ पोटाच्या समस्या वाढवू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या आहारात काही हलके आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही पोटाचे आरोग्य सुधारू शकतात.

1/7

1. दही

दही आपल्या पोटासाठी फायदेशीर असते. यात असलेले प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरिया पचनसंथ्या सुरळीत ठेऊन पोटाच्या इतर समस्याही कमी करतात. रोज दह्याचे सेवन केल्यास पोटाला थंडावा मिळतो. ॲसिडिटीही कमी होते. तुम्ही जेवताना दही इतर पदार्थांसोबत खाऊ शकता.

2/7

2. केळी

पोटाच्या समस्यांवर केळी हे फळ खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटातील ऍसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. केळीमुळे फक्त पोटातील गॅस आणि सूजच कमी होत नाही तर पोटासाठी नैसर्गिक अँटासिडचे कामही करते. सकाळी नाश्ता करताना किवा जेव्हाही भूक लागेल तेव्हा तुम्ही केळी खाऊ शकता.

3/7

3. आले

आल्यामध्ये दाहकता कमी करणारा नैसर्गिक गुणधर्म आहे. ज्यामुळे पोटातील सूज आणि वेदना कमी होतात. आलं खाल्यान् किंवा त्याचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. आणि पोटातील गॅसची समस्याही कमी होते. तुम्ही आलं घातलेला चहा पिऊ शकता किंवा जेवणातही त्याचा समावेश करू शकता. पोटाच्या समस्यांसाठी आलं हे नैसर्गिक औषध आहे.

4/7

4. पाणी

पाणी हा पोटाच्या समस्यांवरचा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत चालू राहते. त्याचबरोबर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. जेवण करताना आणि त्यानंतर लगेच खुप पाणी पिऊ नये. गरज भासल्यास थोडेसे पाणी प्यावे. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नये. 

5/7

5. जिरे आणि बडीशेप

जिरे आणि बडीशेप पोटाच्या आरोगासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे पचन सुधारते. पोटातील गॅस, ऍसिडिटी आणि गुडगुडणे कमी होते. जिरे किंवा बडीशेप पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास किंवा जेवणानंतर थोड्या प्रमाणात चावून खाऊ शकतो. यामुळे तुमचे पोट शांत होण्यास मदत होईल.  

6/7

6. फायबरयुक्त पदार्थ

फायबरमुळे बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होतात आणि पचनासाठीही फायदा होतो. तुम्ही फळे, भाज्या, धान्य आणि शेंगांमधून भरपूर फायबर मिळवू शकता. 

7/7

जवस किंवा आळशी

जवस खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूकेत वाढ होते.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)