रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! फक्त 20 रुपये द्या अन् पोटभर जेवा, पाहा मेन्यू
Indian Railways News In Marathi: रेल्वेच्या जनरल पॅसेंजरमधून तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता 20 रुपयांत तुमचं पोटभर जेवता येणार आहे. नेमका रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते बघाच एकदा..
1/7

2/7

रेल्वे विभागाने जारी केलेल्या निवेदनात लांबपल्ल्याच्या 15 प्रमुख रेल्वे स्थानकांवर 20 रुपयात जेवण उपलब्ध करुन देणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डूवाडी या स्थानकावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
3/7

4/7

5/7

रेल्वे प्रवाशांना कमी पैशात, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जनरल डब्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरोग्यदायी अन्न, नाश्ता, कॉम्बो जेवण आणि पाणी बॉटल जनरल डब्याबाहेर पुरवल्या जातील. 20 रुपयांना मिळणाऱ्या इकॉनॉमी मीलमध्ये सात पुरी (175 ग्रॅम), सुक्या बटाट्याची भाजी, आणि लोणचं यांचा समावेश असेल.
6/7
