International Women’s Day 2023 : बॉलीवूडमधील 'या' स्टार अभिनेत्रींना बेधडक बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण...!
Women’s Day 2023 : आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. दरम्यान महिलांनी आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाचाही गौरव केला जात असताना आता बॉलिवूडमधील अभिनयाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर स्थान मिळवणाऱ्या महिला अभिनेत्रींचंही महिला दिनी कौतुक केलं जात आहे. पण बॉलीवूडमध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्या कोणत्याही विषयावर उघडपणे बोलतात. त्या स्टार अभिनेत्रींना बेधडक बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या स्टार बेधडक अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
1/5
दीपिका पदुकोण
![दीपिका पदुकोण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566195-deepika.jpg)
दीपिका पादुकोन ही राष्ट्रीय स्तरावरील बँटमिंटनपटू राहिलेली आहे. ती प्रसिद्ध भारतीय बँटमिंटनपटू प्रकाश पादुकोन यांची मुलगी आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवत आहे. ती देशातील सर्वात मजबूत महिला आयकॉनपैकी एक आहे. तिच्या कारकिर्दीच्या शीर्षस्थानी, अभिनेत्री तिच्या नैराश्याच्या समस्येबद्दल उघडपणे बोलली. मानसिक आजाराबाबत जनजागृती करण्याच्या महत्त्वावर तिने भर दिला. याशिवाय अभिनेत्रीने अनेक मुद्द्यांवर स्तुत्य पद्धतीने भाष्य केले आहे.
2/5
कंगना राणौत
![कंगना राणौत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566194-kangana.jpg)
कंगना राणौत खंबीर, निडर आणि स्पष्टवक्ते आहे. कंगना आज बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. पंगा गर्लने बॉलीवूडच्या पुरुष प्रधान उद्योगाला प्रत्येक पाऊलावर आव्हान दिले आहे. कंगना हळुहळू पण निश्चितपणे अडथळे तोडून आपली जागा बनवत असते. अभिनेत्रीचे प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट मत असते. भलेही तिला त्याबद्दल ट्रोल केले जाते. पण ती आपल्या वक्तव्यामुळे ती अनेकवेळा अडचणीत आल्याचे दिसते. 'शूट आऊट अँट वडाला', 'क्वीन' आणि 'तनू वेड्स मनू' या चित्रपटांनी ती खूप प्रसिद्ध झाली होती. तिला आजही बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री म्हटलं जातं.
3/5
प्रियांका चोप्रा
![प्रियांका चोप्रा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566193-priyanka-chopara.jpg)
'मिस वर्ल्ड' चा किताब मिळाल्यानंतर प्रियांका चोप्रा चर्चेत आली होती. प्रियांका चोप्राने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिला जागतिक आयकॉन मानले जाते. जातिवादापासून ते लिंगभावाच्या अंतरापर्यंत देसी गर्ल या सामाजिक प्रश्नांवर मोकळेपणाने नेहमी बोलत असते.
4/5
स्वरा भास्कर
![स्वरा भास्कर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566192-swara-bhasakar.jpg)
5/5
तापसी पन्नू
![तापसी पन्नू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/08/566190-tapasi-panu.jpg)