Uttrakhand News: शंभोssss! जगाचा अंत कधी होणार? उत्तराखंडमधील एका गुहेत दडलंय रहस्य
Uttrakhand News: राज्यामध्ये एक असं दैवी स्थान आहे, जिथं जाऊन तिथली रहस्य जाणून तुम्ही अवाक् व्हाल. हे दैवी स्थान म्हणजे पाताळ भुवनेश्वर (Patal Bhuvaneshwar).
Uttrakhand News: देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणांमध्ये उत्तराखंडचाही (Uttarakhand travel) समावेश होतो. (Himalayan Mountain ranges) हिमालय पर्वतरागांचं देणं लाभलेल्या या भागामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जिथं आतापर्यंत कित्येकांनी भेट दिली आणि पाहता पाहता ही ठिकाणं अशी काही प्रकाशझोतात आली, की सध्याच्या घडीला पर्यटनावर उत्तराखंडमधील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. उत्तराखंडमधील पिथौरगढ (Pithorgarh) जिल्ह्यातील गंगोलीहाटपासून 14 किमी अंतरावर पाताळ भुवनेश्वर मंदिराची गुहा आहे. ही एक प्राचीन गुहा असून त्याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्येही पाहायला मिळतो. असं म्हणतात की, जगाचा अंत केव्हा होणार याचं रहस्य या गुहेतच दडलंय.