5 लाख मिळणार; पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना विमा संरक्षण
वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा. विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना जाहीर. वारीकाळातल्या 30 दिवसांसाठी लागू होणार योजना.
Ashadhi Wari 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वारीतील वारक-यांसाठी मोठी घोषणा केली आहे.पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी सरकारर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्यात आली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे.
1/5

3/5
