बांगड्या, औक्षण, निळी साडी अन्... ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पत्नीचं डोहाळे जेवण; पाहा Photos

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Australian Cricketer Wife: हे फोटो फारच सुंदर असून हा संपूर्ण सोहळा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले. या दोघांनीही भारतीय परंपरेनुसारही लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता तिच्या ओटीभरण सोहळ्याचे आणि डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jul 25, 2023, 08:56 AM IST
1/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

निळ्या रंगाच्या काठापदराच्या साडीमध्ये ती खुर्चीवर बसली असून तिच्या गळ्यात फुलांची माळ आहे आणि तिचं औक्षण केलं जात आहे.  

2/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

हा सर्व समारंभ पार पडला आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि ज्या महिलेचं औक्षण केलं जात आहे ती एका ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी आहे असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल.

3/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

पण हे फोटो स्वत: तिनेच शेअर केले आहेत. अगदी नटण्यापासूनचे फोटो तिने सोशल नेटवर्किंगवर शेअर केले आहेत.

4/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

आता ही महिला आहे तरी कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या महिलेचं नाव आहे विनि रमण.

5/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

विनि ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलची पत्नी आहे. मॅक्सेवेल आणि विनि लवकरच आई-बाबा होणार आहेत. 

6/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

विनिने शेअर केलेल्या ओटीभरण आणि डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये मॅक्सवेलही उपस्थित होता. विनिसोबत तो एका फोटोत दिसत आहे.

7/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

मॅक्सवेल या वर्षी जेव्हा आयपीएलसाठी भारत दौऱ्यावर होता तेव्हाच विनिने सोशल मीडियावर आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती.

8/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

विनि ही मूळची भारतीय असून मागील वर्षीच हे दोघे लग्नबंधनात अडकले. 

9/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

भारतीय पंरपरेनुसार अगदी थाटामाटात या दोघांनी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटोही चांगलेच चर्चेत होते.

10/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

मॅक्सवेल आणि विनिने 18 मार्च 2022 रोजी लग्न केलं होतं. 

11/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

त्यानंतर 27 मार्च 2022 रोजी त्यांनी तमिळ रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं. 

12/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

लग्नात अगदी वधू आणि वराला उचलून घेत एकमेकांना वरमाला घातल्याचे फोटोही या दोघांनी शेअर केले होते.

13/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

अगदी हळदीचा कार्यक्रमही विनि आणि मॅक्सवेलने मनापासून एन्जॉय केला होता.

14/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

या दोघांच्या हळदीचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. मॅक्सवेल कुर्त्यामध्ये फारच छान दिसत होता.

15/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

दोघांनी ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केलं होतं. लग्नाआधी अनेक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते.  

16/16

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Vini Raman Glenn Maxwell Wife Goes Viral

मेलबर्नमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विनिची मॅक्सवेलबरोबर ओळख झाल्यानंतर हे दोघे प्रेमात पडले होते.