Indian Railways : इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने घेतला हा निर्णय, कोट्यवधी प्रवाशांना धक्का
IRCTC : भारतीय रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Surendra Gangan
| May 07, 2023, 15:32 PM IST
IRCTC : भारतीय रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला खरा.पण भारतीय रेल्वेने घेतलेला हा निर्णय ऐकून कोरोडो प्रवाशांना मोठा धक्का बसेल. प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. रेल्वे बोर्डाने हा मोठा ऐतिहासिक निर्णय का घेतला आहे? 2017 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यकाळात असा निर्णय घेण्यात आला होता, ज्यामध्ये रेल्वेद्वारे चालवले जाणारे प्रिंटिंग प्रेस बंद करण्याची चर्चा होती.
1/5
छपाईचे संपूर्ण कंत्राट आता खासगी विक्रेत्यांना
2/5
रेल्वेच्या प्रिटिंग प्रेस होणार बंद
3/5
मुंबईसह दिल्लीतील प्रेस बंद
जून 2019 च्या रेल्वेच्या आदेशात असे म्हटले आहे की, भायखळा मुंबई, हावडा, शकूरबस्ती-दिल्ली, रोयापुरम चेन्नई आणि सिकंदराबाद येथे चालणाऱ्या प्रिटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 4 जून 2019 रोजीच्या रेल्वेच्या पत्रात प्रेस बंद करण्याचे म्हटले होते. या बातम्यांनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की, आगामी काळात रेल्वेची तिकिटे कशी छापली जाणार? त्यासाठी आगामी काळात खासगी प्रिटिंग प्रेसना निविदा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
4/5
रेल्वेची तिकिटे कशी छापली जाणार?
तिकिटांची छपाई आणि इतर साहित्य तयार करण्याचे कंत्राट खासगी मुद्रणालयाला जाणार आहे. रेल्वे आता फक्त गाड्या चालवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आरक्षित तिकिटे बहुतेक ई-तिकीटिंगद्वारे बुक केली जातात. याशिवाय 81 टक्के तिकिटे ई-तिकीटिंगद्वारे डिजिटल पद्धतीने बुक केली जातात.
5/5