ट्रेननं प्रवास करतानाही होऊ शकतो तुरुंगवास, 'हे' नियम तुम्हाला माहिती आहेत का?

ट्रेननं प्रवास करत असताना अनेक लोक काही नियमांकडे दुर्लक्ष करतात. ज्याविषयी अनेकांना तर माहितही नसतं. या नियमांनी फक्त तुमच्या सुरक्षेसाठी नाही तर त्यासोबत तुमच्यासोबत प्रवास करत असलेल्या इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खूप गरजेचा आहे. अशात त्या नियमांचे पालन करणं किंवा माहित असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या विषयी माहित नसेल तर तुमच्या विरोधात कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला तुरुंगात जाण्याचीही शक्यता आहे.

| Jan 06, 2025, 17:43 PM IST
1/7

आता तुम्हाला वाटत असेल की असे कोणते नियम आहेत. ज्याकडे तुम्ही इतके दिवस दुर्लक्ष करत आलात किंवा तुम्हाला त्याकडे माहित नाही. त्याविषयी जाणून घेऊया.

2/7

ट्रेनमध्ये आवाज करु नये. याशिवाय शिवीगाळ करणं चुकीचं आहे. त्याशिवाय दुसऱ्या प्रवाशांना त्रास देणं चुकीचं आहे. 

3/7

ट्रेन चालू असताना त्यातून हात बाहेर काढणं धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. 

4/7

ट्रेनमध्ये मद्यपान करणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना काही अडचणी येण्याची शक्यता आहे आणि तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येऊ शकते. 

5/7

ट्रेनमध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. असे केल्यास तुम्हाला मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागू शकते.

6/7

जर तुमच्याकडे रिझर्व सीट आहे. तर त्या सीटवरच बसा. दुसऱ्या कोणाच्या सीटवर बसणं चुकीचं आहे आणि तुम्हाला त्यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो. 

7/7

दरम्यान, वर देण्यात आलेल्या सगळ्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. तसे न केल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते.