Republic Day: अंगावर वर्दी आणि खांद्यावर स्टार; भारताचे 'हे' स्टार खेळाडू आहेत लष्करात अधिकारी

आज संपूर्ण देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (74th Republic Day) साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आपण अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करतात.

Jan 26, 2023, 11:56 AM IST

Republic Day 2023: आज संपूर्ण देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (74th Republic Day) साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आपण अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करतात.

1/5

Indian Army, Indian Cricketers, Republic Day, MS Dhoni, Sachin Tendulkar, Kapil Dev

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लहानपणासून लष्करात जाण्याची इच्छा होती. धोनी अनेकदा मोकळ्या वेळेत जवानांसोबत वेळ घालवत असतो. 2015 मध्ये धोनीला भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्त करण्यात आलं.  

2/5

Indian Army, Indian Cricketers, Republic Day, MS Dhoni, Sachin Tendulkar, Kapil Dev

भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देवही लष्करात आहेत. कपिल देव यांना 2008 मध्ये भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आलं. दरम्यान 2019 मध्ये कपिल देव यांना हरियाणा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे चान्सलर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.   

3/5

Indian Army, Indian Cricketers, Republic Day, MS Dhoni, Sachin Tendulkar, Kapil Dev

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या यादीत समाविष्ट आहे. सचिन तेंडुलकरला 2010 मध्ये भारतीय हवाई दलाच्या कॅप्टनपदी नियुक्त करण्यात आलं.   

4/5

Indian Army, Indian Cricketers, Republic Day, MS Dhoni, Sachin Tendulkar, Kapil Dev

फक्त भारतीय लष्करच नाही तर अनेक खेळाडू पोलीस खात्यातही अधिकारी आहे. भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला पंजाब पोलिसांत डीसीपी पद देण्यात आलं आहे. तो राज्यसभेचा खासदारही आहे.   

5/5

Indian Army, Indian Cricketers, Republic Day, MS Dhoni, Sachin Tendulkar, Kapil Dev

2007 मध्ये भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. गोलंदाज जोगिंदर शर्माने या सामन्यात मोलाची भूमिका निभावली होती. पण जोगिंदर जास्त काळ भारतीय संघात आपली जागा कायम राखू शकला नाही. जोगिंदर आता हरियाणा पोलिसात डीसीपी पदावर कार्यरत आहे.