IND vs AUS: खेळण्याआधीच भारताला मोठा धक्का, पहिला सामना रद्द होणार? राहुल द्रविड का संतापला आहे?
IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पूर्ण तयारी झाली आहे. 9 फेब्रुवारीला नागपुरात (Nagpur) पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. दरम्यान सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) खेळपट्टीवरुन नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवला जाणार असून आयोजक तयारी करत आहेत.
पण सामना सुरु होण्याआधीच मोठा वाद झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर नाराज आहे. राहुल द्रविडने ही खेळपट्टी बदलण्याची मागणी केली आहे. खेळपट्टीवर गवत पाहून राहुल द्रविड संतापला होता. (AFP)

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करत आहे. घरच्या मैदानावरील कामगिरी चांगली असल्या कारणाने भारताला पराभूत करणं कोणत्याही संघासाठी सोप्पं नसतं. दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. (AFP)




