भारतातील सर्वांत सुंदर महाराणीने परिधान केली 100 वर्ष जुनी पैठणी साडी; यांच्या सौंदर्यापुढे सगळं काही फेल!

भारतातील राजेशाही आणि त्यांची परंपरा पाहून सगळेच थक्क होतात. राजवाडे, परंपरा आणि राजघराण्यांच्या कथा आजही सांगितल्या जातात. महाराणी राधिकाराजे गायकवाड या भारतातील सर्वांत सुंदर महाराणी आहेत. त्यांचे काही रॉयल फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यात त्यांनी काळ्या रंगाची पैठणी परिधान केली आहे. ही पैठणी खूपच खास आहे. 

Jan 27, 2025, 20:17 PM IST

Radhikaraje Gaekwad  Black Paithani : भारतातील राजेशाही आणि त्यांची परंपरा पाहून सगळेच थक्क होतात. राजवाडे, परंपरा आणि राजघराण्यांच्या कथा आजही सांगितल्या जातात. महाराणी राधिकाराजे गायकवाड या भारतातील सर्वांत सुंदर महाराणी आहेत. त्यांचे काही रॉयल फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यात त्यांनी काळ्या रंगाची पैठणी परिधान केली आहे. ही पैठणी खूपच खास आहे. 

1/7

 महाराणी राधिकाराजे गायकवाड या भारतातील सर्वात सुंदर महाराणी म्हणून ओळखल्या जातात. फोर्ब्सने त्यांना सुंदर महाराणी असा किताब दिला आहे. 

2/7

महाराणी राधिकाराजे या उच्चशिक्षित आहेत. महाराणी राधिकाराजे यांनी भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 

3/7

राधिकाराजे यांचा जन्म वांकानेर येथील महाराजकुमार डॉ.रणजितसिंहजी यांच्या कुटुंबात झाला. 2002 मध्ये बडोद्याचे महाराजा समरजितसिंहराव गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

4/7

राधिकाराजे गायकवाड यांनी परिधान केलेली नऊवारी पैठणी काळ्या रंगाची आहे. याच्या पदरावर आणि काठावर सोनेरी जरीचे बारीक नक्षीकाम करण्यात आले आहे. 

5/7

राधिकाराजे गायकवाड यांनी परिधान केलेली पैठणी खूप खास आहे. ही पैठणी 100 वर्ष जुनी आहे. 

6/7

राधिकाराजे गायकवाड  एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळेस त्यांनी काळ्या रंगाची पैठणी परिधान केली होती.  

7/7

गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हा ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. या घरात  राधिका राजे गायकवाड या राणीसारख्या राहतात.