अश्विन ते ऋषभ पंत... टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो, बांगलादेशला फोडला घाम

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. या सीरिजचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आला.  टीम इंडियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी 280 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला. भारतीय टीमच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचे झाले तर 5 खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने बांगलादेशला फोडला घाम. ते खऱ्या अर्थाने भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.   

Pooja Pawar | Sep 22, 2024, 13:14 PM IST
1/6

ऋषभ पंत :

टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याने तब्बल दोन वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक केले. 2022 डिसेंबरमध्ये ऋषभ पंत कर अपघातात गंभीर जखमी झाला होता, ज्यामुळे त्याच्या पायांवर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. टेस्टमध्ये कमबॅक करणाऱ्या पंतने पहिल्याच सामन्यात बांगलादेशची दाणादाण उडवली. पंतने पहिल्या इनिंगमध्ये 39 तर दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना 109 धावा करत शतक ठोकले. हे त्याचे टेस्ट क्रिकेटमधील 6 वे शतक होते. यासह त्याने एम एस धोनीच्या विक्रमाशी सुद्धा बरोबरी केली. 

2/6

शुभमन गिल :

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल याने बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना टेस्ट क्रिकेटमधील 5 वे शतक ठोकले. खरंतर शुभमन या सामान्यांच्या हा पहिल्या इनिंगमध्ये डकआउट झाला होता. बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूदने त्याला बाद केले होते. मात्र त्यानंतर दुसऱ्याच इनिंगमध्ये शुभमन गिलने कमबॅक करून 119 धावा करून शतक ठोकले. दरम्यान त्याने 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. 

3/6

आर अश्विन :

38  वर्षांचा दिग्गज गोलंदाज आर अश्विन हा खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा संकटमोचक ठरला. पहिल्या इनिंगमध्ये टीमचे दिग्गज फलंदाज बाद झाल्यावर अश्विनने जडेजाच्या साथीने तब्बल 195 हुन अधिक धावांची पार्टनरशिप केली. दरम्यान अश्विनने 113 धावा करून शतक ठोकले, जे टेस्ट मधील त्याचे 5 वे शतक होते.  बांगलादेश विरुद्ध केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही त्याने चमक दाखवली. अश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये बांगलादेशच्या 6 विकेट्स घेतल्या. बांगलादेश विरुद्ध दमदार परफॉर्मन्समुळे अश्विनला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार सुद्धा देण्यात आला. 

4/6

रवींद्र जडेजा :

टीम इंडियाचा स्टार ऑल राउंडर रवींद्र जडेजा याने बांगलादेश विरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये मोठे योगदान दिले. पहिल्या इनिंगमध्ये टीम संकटात असताना जडेजाने अश्विन सोबत पार्टनरशिप करताना व्यक्तिगत 86 धावा केल्या. तर गोलंदाजी करताना पहिल्या इनिंगमध्येही त्याने 2 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या. 

5/6

जसप्रीत बुमराह :

अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने देखील बांगलादेशची फलंदाजी नेस्तनाबूत करण्यात मोठे योगदान दिले. गोलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये बुमराहने एकूण 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 1 महत्वाची विकेट घेतली. 

6/6

टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध पहिला टेस्ट सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0  ने आघाडी घेतली आहे. भारत - बांगलादेश यांच्यातील दुसरा टेस्ट सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.