WTC Final: नव्या जर्सीत एकदम धांसू दिसतेय Team India! संभाव्य Playing 11 चा New Look पाहिला का?

IND vs AUS WTC Final Indian Playing 11: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 7 जूनपासून ओव्हलच्या मैदानामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (World Test Championship Final) सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यानिमित्त ऑस्ट्रेलियाबरोबरच भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं नुकतेच अनावरण करण्यात आले. याच नव्या जर्सीमध्ये टीम इंडियातील खेळाडूंचं विशेष फोटोशूट करण्यात आलं आहे. या फोटोंवरुन भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याचा अंदाज बांधला जात आहेत.

Swapnil Ghangale | Jun 06, 2023, 10:13 AM IST
1/15

IND vs AUS WTC Final

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनलचा सामना ओव्हल मैदानामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळवला जाणार आहे. रोहित शर्माकडे नेतृत्वाबरोबरच स्वत:ची फलंदाजीमधील हरवलेली लय शोधण्याचंही आव्हान असणार आहे.

2/15

IND vs AUS WTC Final

अनुभवी खेळाडू म्हणून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी आर. अश्विनच्या खांद्यावरच असेल असं मानलं जात आहे.

3/15

IND vs AUS WTC Final

विकेटकीपर म्हणून के. एस. भारतला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.  

4/15

IND vs AUS WTC Final

विश्वासाचा सलामीवीर म्हणून केवळ टी-20 मध्येच नाही तर कसोटीमध्येही अल्पावधीत शुभमन गिलने नाव कमावलं असल्याने त्याला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

5/15

IND vs AUS WTC Final

अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाचं स्थान जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.

6/15

IND vs AUS WTC Final

भारतीय फलंदाजीचा कणा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या विराट कोहलीकडून या सामन्यात दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. विराटने या सामन्यात शतक झळकवावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. 

7/15

IND vs AUS WTC Final

विकेटकीपर बॅट्समन म्हणून इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये त्याची दुखापत आड येऊ शकते.

8/15

IND vs AUS WTC Final

फिरकीपटू आणि फलंदाज अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या अक्सर पटेललाही प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळू शकते.

9/15

IND vs AUS WTC Final

मॉर्डन एरामधील राहुल द्रविड अशी ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारा इतका भरोश्याचा कसोटीपटू सध्या कोणत्याही संघात नाही.

10/15

IND vs AUS WTC Final

ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव अजिंक्य रहाणेला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळवून देऊ शकतो.

11/15

IND vs AUS WTC Final

मोहम्मद शमीचा अनुभव आणि गोलंदाजी पाहता त्याचं स्थान संघात जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.

12/15

IND vs AUS WTC Final

मोहम्मद सिराजचाही संभाव्य प्लेइंग इलेव्हन समावेश असू शकतो अशी दाट शक्यता आहे.

13/15

IND vs AUS WTC Final

शार्दुल ठाकूरचाही संभाव्य प्लेइंग इलेव्हमध्ये समावेश आहे.

14/15

IND vs AUS WTC Final

जयदेव उनाडकटचाही संघात समावेश होऊ शकतो.

15/15

IND vs AUS WTC Final

उन्मेश यादवला संघात संधी मिळू शकते.