IND vs AUS: BCCI ने अचानक बदलून टाकला भारताचा उपकर्णधार; 'या' खेळाडूवर मोठी जबाबदारी

Team India Squad Announced: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे सिरीजसाठी भारतीय टीमची घोषणा केली.

Surabhi Jagdish | Sep 19, 2023, 12:56 PM IST
1/5

ऑस्ट्रेलियाविरूद्ध टीम इंडियाची स्क्वॉड जाहीर केल्यानंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये टीम इंडियाचा उप कर्णधार बदलला आहे. 

2/5

यामध्ये रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलीये. तर स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनचं टीममध्ये कमबॅक झालंय.

3/5

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये तर तिसरा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला येणार आहे.

4/5

टीम इंडियामध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. 

5/5

अशा परिस्थितीत बीसीसीआयने रवींद्र जडेजाला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.