World Environment Day Special : 'या' आहेत भारतातील टॉप ५ इलेक्ट्रिक कार...
देशासोबतच जगातील वाहनांचे भविष्य आता इलेक्ट्रिक कार्सच्या दिशेने जात आहे आणि पर्यावरणाच्या बचावासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे.
मुंबई : दरवर्षी 5 जूनला पर्यावरण दिन साजरा केला जातो. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही तुम्हाला भारतील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही पर्यावरणाला पुरक राहुन, पर्यावरणाचे नुकसान होण्यापासून वाचवू शकाल. देशासोबतच जगातील वाहनांचे भविष्य आता इलेक्ट्रिक कार्सच्या दिशेने जात आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 25 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत.
1/5
Hyundai Kona EV
Hyundai ने भारतात एक इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली आहे, जिचे नाव 'Kona EV' हे आहे. भारतीय बाजारात लाँच झालेली ही पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ठरली आहे. Hyundai Kona EV ची एक्स-शोरूमची किंमत 23.79 लाख रुपये इतकी आहे. तर 25 लाख रुपयांच्या आत ही सर्वात लांब रेंजची EV आहे, जी एका चार्जिंगमध्ये 452 किमी पर्यंत धावू शकते. Hyundai ने या इलेक्ट्रिक SUV सोबत 39.2 kWh-लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी दिली आहे.
2/5
Tata Nexon EV Max
Tata Motors ने भारतातील लोकप्रिय नैक्सॉन इलेक्ट्रिक SUV चं, Naxon EV Max हे नवीन वर्जन लॉन्च केलं आहे, नॅक्सॉन ईवीच्या स्टॅडर्ड मॉडलसाठी जवळ जवळ 6 महिन्यांची वेटिंग करावी लागत आहे. नवीन Nexon EV Max ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत रु. 17.74 लाख ठेवण्यात आली आहे, तिचे टॉप मॉडेल 19.24 लाखांपर्यंत मिळते. नवीन EV दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे एक म्हणजे ZX + आणि दुसरं म्हणजे ZX + LUX, जे पुढे जाऊन चार ट्रिममध्ये विभागले गेले आहेत. Nexon EV Max बद्दल सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तिची रेंज. एआरएआई नुसार, नवीन EV एका चार्जमध्ये 437 किमी पर्यंत चालवता येऊ शकते.
3/5
MG ZS EV
MG Motor India ने भारतात 2022, MG ZS EV हे मॉडल मोठ्या प्रमाणात लाँच केले आहे. ज्याची स्टार्टिंग प्राईज एक्स-शोरूमला 21.99 लाख रुपये इतकी आहे. ही किंमत इलेक्ट्रिक SUV च्या बेस एक्साइट वेरिएंटची आहे जी ग्राहकांना जुलै 2022 पासून उपलब्ध होणार आहे, तर आतापासून उपलब्ध असणाऱ्या मॉडेलचे नाव एक्सक्लुझिव्ह आहे आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 25.88 लाख रुपये एवढी आहे. MG India ने या इलेक्ट्रिक SUV को 50.3 kWh बैटरी पैक दिला आहे जो IP69 वॉटरप्रूफ रेटिंगचा आहे. तसेच, ही SUV आता एका चार्जवर 461 किमीचा प्रवास करते.
4/5
Tata Tigor EV
पेट्रोल आणि डिझेलचे दर आता सर्वसामान्यांचे बजेट बिघडवत असून गाडी वापरणे हे दिवसेंदिवस कठीण होतंय. Tata Tigor EV ची एक्स-शोरूम स्टार्टिंग प्राईज 12.24 लाख रुपये इतकी आहे, तर टॉप मॉडेलसाठी 13.24 लाख रुपये आहे. एका चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक कार 300 किमी पर्यंत धावते. कंपनीने XE, XM आणि XZ+ या तीन प्रकारांमध्ये नवीन Tigor EV लाँच करत आहे. XZ+ वर ड्युअल टोन पर्याय देखील दिला आहे. टाटाचं असं म्हणणं आहे की, कारच्या बेस्ट ड्राइविंग डायनामिक्स आणि फास्ट हैंडलिंगसाठी संतुलित सस्पेंशन दिलं आहे.
5/5