पेट्रोल-डिझेलवर नाही तर आता हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस होणार सुरु

Feb 22, 2021, 15:39 PM IST
1/5

देशात लवकरच हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्यांची सुरुवात होणार आहे. पेट्रोल-डिझेलची मागणी जास्त असल्यामुळे किंमती देखील जास्त आहे. त्यामुळे आता यावर जास्त अवलंबून राहू नये म्हणून सरकार हायड्रोजन फ्यूलवर चालणाऱ्या बसेस सुरु करणार आहे.

2/5

नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) दिल्ली ते जयपूर दरम्यान एक हाइड्रोजन (Hydrogen Fuel) वर चालणारी बस चालवणार आहे. याचा वापर इंटरसिटी परिवहनमध्ये केला जाणार आहे.

3/5

मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये देखील याबाबत चाचणी सुरु आहे. 2018 मध्ये टाटा मोटर्स आणि IOC ने देशात पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पावर्ड बसला हिरवा कंदील दिला होता.

4/5

दिल्लीमध्ये गो इलेक्ट्रिक कॅम्पेनचा शुभारंभ करताना ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी शुक्रवारी म्हटलं की, `आम्ही दिल्ली ते जयपूरसाठी प्रीमियम हायड्रोजन फ्यूल बस सेवा सुरू करण्याची योजना बनवली आहे.'

5/5

परिवहन मंत्र्यांनी याआधी कर्मचाऱ्यांना फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्रात सरकार शहरांअंतर्गत प्रवासासाठी 40,000 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याच्या विचारात आहे.