लग्नात मंगळसूत्र बांधताना किती गाठी बांधाव्यात? जाणून घ्या

शास्त्रानुसार लागत मंगळसूत्र बांधताना किती गाठी बांधल्या जात आहेत हे ध्यानात ठेवावे. कारण, या गाठींना विशेष महत्त्व आहे.  

तेजश्री गायकवाड | Jan 20, 2025, 15:32 PM IST

शास्त्रानुसार लागत मंगळसूत्र बांधताना किती गाठी बांधल्या जात आहेत हे ध्यानात ठेवावे. कारण, या गाठींना विशेष महत्त्व आहे.

 

1/7

मंगळसूत्र हे लग्नाची निशाणी मानली जाते. हे विवाहाच्या प्रतीकात्मक प्रकारांपैकी एक आहे. मंगळसूत्राबाबत असे म्हटले जाते की, विवाहित महिलांनी ते धारण केल्याने पतीचे आयुर्मान वाढते आणि त्यांच्यासमोर येणारी प्रत्येक समस्या दूर होते.   

2/7

मात्र, मंगळसूत्राशी संबंधित अनेक नियम शास्त्रात सांगितले आहेत. यापैकी एक आहे तो परिधान करण्याशी संबंधित नियम. मंगळसूत्र घालताना किती गाठी बांधल्या आहेत हे ध्यानात ठेवावे, असे शास्त्रात नमूद आहे कारण या गाठींना विशेष महत्त्व आहे.  

3/7

शास्त्रामध्ये नमूद केलेल्या नियमांनुसार मंगळसूत्र घालताना 3 गाठी बांधल्या पाहिजेत कारण या तीन गाठी जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांचे प्रतीक मानल्या जातात.

4/7

कोणत्याही वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये तीन घटकांची देवाणघेवाण होत असते. ही तीन तत्त्वे म्हणजे मनसा म्हणजे विचार, वाचा म्हणजे  वाणी आणि कर्मण म्हणजे कृती.

5/7

पती-पत्नी त्यांचे नाते याच तीन आधारावर चालते आणि त्यांचे नाते वरच्या अजून बहारते. मंगळसूत्राच्या या 3 गाठी या तीन घटकांना बळ देण्याचे काम करतात.  

6/7

 तिसऱ्या गाठीच्या प्रभावामुळे, जोडपे एकमेकांना चांगले कर्म आणि अध्यात्माकडे नेण्याचे कार्य करतात. यामुळे पुण्यप्राप्तीही  होते.

7/7

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)