वजन कमी करण्यासाठी धावताय? पण 'या' चूका केल्यास सांधे होतील कमजोर

मॉर्निंग वॉक किंवा धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळं फक्त वजनच कमी होत नाही तर शरीराही फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यास मदत मिळते. मात्र धावत असताना काही चुका केल्या तर त्याचा परिणाम गुडघ्यांवर होतो. त्यामुळं गंभीर नुकसान होऊ शकते . 

| Oct 22, 2024, 14:13 PM IST

Health Tips In Marathi: मॉर्निंग वॉक किंवा धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळं फक्त वजनच कमी होत नाही तर शरीराही फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यास मदत मिळते. मात्र धावत असताना काही चुका केल्या तर त्याचा परिणाम गुडघ्यांवर होतो. त्यामुळं गंभीर नुकसान होऊ शकते . 

1/7

वजन कमी करण्यासाठी धावताय? पण 'या' चूका केल्यास सांधे होतील कमजोर

health tips in marathi Avoid these mistakes while running otherwise joints become weaker

 योग्य प्रमाणे धावणं जितकं फायदेशीर असतं तितकेच चुकीच्या पद्धतीने धावल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. आम्ही तुम्हाला याच काही चुका सांगणार आहोत. धावताना केलेला हलगर्जीपणा तुमच्या अंगलट येणार नाही. 

2/7

चुकीचा शूज निवडणे

health tips in marathi Avoid these mistakes while running otherwise joints become weaker

धावण्यासाठी चुकीचे फुटवेअर निवडण्याने तुमचे नुकसान होऊ शकते. तुमचे पाय, गुडघे आणि सांध्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळं सांधे कमकुवत होऊ शकतात. त्यामुळं धावण्यासाठी जे रनिंग शुज असतात त्याचाच वापर करा. जे तुमच्या पायांना आणि सांध्यांसाठी योग्य ठरतील. 

3/7

वॉर्मअप करणे

धावण्याच्या आधी वॉर्मअप करणे खूप गरजेचे आहे. वॉर्म अपदरम्यान मसल्स आणि सांध्यावर थेट परिणाम होतो. ज्यामुळं गंभीर इजा होण्याची शक्यता असते. अशावेळी स्ट्रेचिंग आणि थोडा व्यायाम केल्याने तुमचं शरीर मोकळं होतं. 

4/7

चुकीच्या स्थितीत धावणे

धावताना शरीराची योग्य स्थिती असणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही चुकीच्या स्थितीत धावत असाल, जसं की खांदे झुकवून किंवा पायाची चुकीची स्थिती यामुळं सांध्यावर अवाजवी ताण येतो. त्यामुळं सांधेदुखी आणि अशक्तपणा येतो. 

5/7

ओव्हरट्रेनिंग

खूप जास्त धावल्याने शरीर आणि सांध्यावर दबाव येऊ शकतो. आराम न करता धावल्याने मांसपेशी आणि सांधे कमजोर होऊ शकतात. त्यामुळं गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळं शरीरालाही पुरेशा आराम देण्याची गरज असते. 

6/7

चुकीच्या ठिकाणी धावणे

धावण्यासाठी योग्य जागा निवडण्याची गरज आहे. खडबडीत जागेवर धावल्यास सांध्यावर अतिरिक्त दबाव पडू शकतो. शक्यतो नरम आणि समतोल असलेल्या जागीच धावण्यासाठी जा. 

7/7

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)