साखर नसलेले डार्क चॉकलेट का खाल्लं पाहिजे? हे 5 फायदे जाणून घ्या

चॉकलेटचं नाव ऐकताच लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींच्याही तोंडाला पाणी सुटतं. मात्र, हल्ली आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. मधुमेहाचे रुग्णदेखील वाढत आहेत. अशावेळी चॉकलेट खाणं टाळलं जातं.

| Jul 07, 2024, 13:23 PM IST

चॉकलेटचं नाव ऐकताच लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींच्याही तोंडाला पाणी सुटतं. मात्र, हल्ली आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. मधुमेहाचे रुग्णदेखील वाढत आहेत. अशावेळी चॉकलेट खाणं टाळलं जातं.

1/7

साखर नसलेले डार्क चॉकलेट का खाल्लं पाहिजे? हे 5 फायदे जाणून घ्या

Health Benefits Of Sugarless Dark Chocolate in marathi

चॉकलेट कितीही आवडतं असलं तर त्यात साखरेचं प्रमाण जास्त असल्याने खाणं टाळलं जातं. अशावेळी तुम्ही डार्क चॉकलेट खावू शकता. डार्क चॉकलेट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

2/7

Health Benefits Of Sugarless Dark Chocolate in marathi

गोड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही डार्क चॉकलेट खावू सकता. डार्क चॉकलेटमध्ये साखर नसते. त्याचबरोबर यात आरोग्यासाठी अनेक फायदेशीर गुणधर्म असतात. त्याचमुळं हेल्दी फुड्सच्या यादीत डार्क चॉकलेटचा समावेश आहे. जाणून घेऊया डार्क चॉकलेटचे फायदे 

3/7

Health Benefits Of Sugarless Dark Chocolate in marathi

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनॉयड्स आणि पॉलीफेनाल्स सारखे अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे ब्लडप्रेशर कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर हृदविकाराचा धोकाही कमी करतात. रक्ताच्या गुठळ्या जमा होण्यापासून रोखते तसंच, नसामधील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करतात. ज्यामुळं हृदयाचे आरोग्य सुधारते. 

4/7

Health Benefits Of Sugarless Dark Chocolate in marathi

डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेवोनॉयड्स मेंदुतील रक्तपुरवठा वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळं मानसिक स्वास्थ आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच, मूड चांगला राहतो. डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यास फायदेशीर असतात. रिसर्चनुसार, डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदुचा विकास होतो. 

5/7

Health Benefits Of Sugarless Dark Chocolate in marathi

डार्क चॉकलेटमध्ये अँटी ऑक्सिडेंट असते जे त्वचा फ्री रेडिकल्स होण्यापासून रोखते. हे त्वचा हायड्रेट ठेवते. त्याचबरोबर यातील फ्लेवोनॉयड्स सूर्याची हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षणे करते. दररोज डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास त्वचा उजळते. 

6/7

Health Benefits Of Sugarless Dark Chocolate in marathi

डार्क चॉकलेटमध्ये कॅलरी कमी असतात त्यामुळं भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसंच, वजन कमी करण्यासही मदत होते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने चयापचय वाढतो, ज्यामुळे कॅलरी लवकर कमी होतात. मात्र, योग्य प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन केले पाहिजे त्यामुळं वजन नियंत्रित राहते. 

7/7

Health Benefits Of Sugarless Dark Chocolate in marathi

डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन आणि कॅफीनसारखे घटक असतात, जे शारीराला उर्जा पुरवतात. त्यामुळं थकवा कमी होण्यास मदत होते. वर्कआऊट करण्यापूर्वी थोडे डार्क चॉकलेट खाल्ल्याने उर्जा वाढते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)