ढगांवर तरंगणारे कोकणातील सर्वात सुंदर गाव! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घोषीत केले थंड हवेचे ठिकाण
कोकणातलं गे गाव मीनी महाबळेश्वर म्हणून ओखळले जाते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हे गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केले आहे.
Machal Village Ratnagiri : कोकणात समुद्र किनारे आणि इथला निसर्ग कायमच पर्यटकांना खुणावत असतो. मात्र याच कोकणात असं एक ठिकाण आहे ते पर्यटकांना आता खुणावतंय. या ठिकाणाला कोकणातलं मीनी महाबळेश्वर असंही संबोधलं जातं. हे आहे रत्नागिरीतलं माचाळ गाव. माचाळ हे गाव पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय. सुंदर निसर्ग, खळाळणारे पाणी, दाट धुके, नागमोडी वाटा, अतिशय नयनरम्य परिसर माचाळचा पाहण्याजोगा आहे. तुम्हीही एकदा येथे पावसाळ्यात भेट देऊन कोकणातल्या निसर्गसोंदर्याचा आगळा वेगळा आंनद नक्कीच घेऊन पहा.





