विराट कोहलीच्या निवृत्तीवर हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी, म्हणाला 'त्याने जर स्वत:ला...'

Harbhajan Singh Prediction : टीम इंडियाच्या फलंदाजीचे स्तंभ असलेले खेळाडू विराट कोहली (Harbhajan Singh on Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशातच आता दोघंही वनडेमधून निवृत्ती घेणार की काय? अशी भीती व्यक्त होतीये.

Saurabh Talekar | Aug 13, 2024, 18:42 PM IST
1/5

हरभजन सिंग म्हणतो...

रोहित शर्माची फिटनेस आपण पाहिली तर तो आणखी दोन वर्ष नक्कीच टीम इंडियासोबत खेळू शकेल, असं माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने म्हटलं आहे. 

2/5

विराट कोहली

त्यावेळी त्याने विराट कोहलीवर देखील मोठं वक्तव्य केलं. विराट कोहली आणखी 5 वर्ष भारतीय संघासाठी योगदान देऊ शकतो, असं हरभजन सिंगने म्हटलं आहे. 

3/5

सर्वात फिट क्रिकेटपटू

विराट टीम इंडियामधील सर्वात फिट क्रिकेटपटू आहे. विराट कोहली एखाद्या युवा 19 वर्षांच्या खेळाडूला फिटनेसच्या बाबतीत देखील मागे सोडू शकतो, असं हरभजन सिंगने म्हटलं आहे.

4/5

बरंच क्रिकेट शिल्लक

विराट आणि रोहितमध्ये बरंच क्रिकेट अजूनही शिल्लक आहे. पण शेवटी तो त्यांचा निर्णय असेल. चांगली कामगिरी करत असेल तर त्यांनी खेळ चालू ठेवला पाहिजे, असं मत देखील भज्जीने मांडलं आहे.  

5/5

तिन्ही फॉरमॅट

दरम्यान, रेड बॉल क्रिकेटमध्ये या दोन्ही खेळाडूंची गरज टीम इंडियाला आहे. तुमच्याकडे तिन्ही फॉरमॅट खेळणारे खेळाडू हवे असतात आणि भारताकडे असे खेळाडू कमी आहेत, असंही हरभजनने म्हटलंय.