PHOTO : राजकुमारीनं 21 वर्षी केलं लग्न, 2012 मध्ये घटस्फोट आणि 2024 मध्ये घटस्फोटीत अभिनेत्याशी गुपचूप विवाह; ही अभिनेत्री कोण?

Entertainment : ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे राजकुमारी. तिने वयाच्या 21 व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. पण ते नातं 4 वर्षांमध्ये संपुष्टात आलं. त्यानंतर घटस्फोटित अभिनेत्याशी तिने गुपचूप लग्न केलं. तर तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून अवाक् व्हाल. 

Oct 28, 2024, 10:03 AM IST
1/11

आज आम्ही तुम्हाला एका अशा सौंदर्यवतीची ओळख करून देणार आहोत जिने बॉलिवूडपासून दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीपर्यंत अगदी ओटीटीवरही आपला ठसा उमटवलाय. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट आणि मालिकांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवून खूप मोठा चाहतावर्गही निर्माण केलाय. 

2/11

या अभिनेत्रीचा संबंध राजघराण्याशी आहे. ती खऱ्या आयुष्यातील राजकुमारी आहे. या अभिनेत्रीने 2006 मध्ये एका साऊथ चित्रपटातून आफल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 

3/11

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केल्यानंतर या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतील आणि येथेही ती प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक झाली. ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतं. 

4/11

आम्ही बोलत आहोत हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री अदिती राव हैदरी, जी आज 28 ऑक्टोबरला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबाद, तेलंगणा इथे झाला. अदिती राव हैदरी हे बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ए-लिस्टर अभिनेत्रींच्या यादीत शामिल झालीय. 

5/11

अदिती माजी पंतप्रधानांची नात आहे. होय, खरं तर अदितीच्या वडिलांचं आजोबा अकबर हैदरी होते, हैदराबाद संस्थानाचे माजी पंतप्रधान. अदितीच्या वडिलांचं नाव एहसान हैदरी होते ते व्यवसायाने इंजिनियर होते आणि आई विद्या राव गायिका होत्या. 

6/11

अदितीचे आजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 या काळात हैदराबादचे पंतप्रधान होते. तर तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी हे आसामचे माजी राज्यपाल होते. आदिती ही आमिर खानची माजी पत्नी किरण रावची चुलत बहीण आहे.

7/11

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आदिती राव हैदरी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच विवाहित होती. 2009 मध्ये, वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी, तिने बॉलिवूड अभिनेता आणि वकील सत्यदीप मिश्रासोबत पहिलं लग्न केलं होतं. तिच्या करिअरवर परिणाम होऊ नये अशी इच्छा असल्यामुळे अभिनेत्रीने तिचं नातं काही काळ जगापासून लपवून ठेवलं होतं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि लग्नाच्या चार वर्षानंतर म्हणजेच 2013 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

8/11

आदितीच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा एन्ट्री झाली. ती साऊथ अभिनेता सिद्धार्थच्या प्रेमात पडली. सिद्धार्थचं आधीच घटस्फोट झाला होता. सिद्धार्थचं पहिलं लग्न साऊथ अभिनेत्री मेघना नारायणसोबत झालं होतं. 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

9/11

सिद्धार्थ आणि आदितीने सुरुवातीला त्यांचं अफेअर लपवून ठेवले होतं, पण ते म्हणतात की इश्क और मुश्क छिपाये नही छिपता, अभिनेत्रीसोबतही असंच घडलं. 3 वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, दोघांनी सप्टेंबर 2024 मध्ये 400 वर्षे जुन्या मंदिरात गुप्त विवाह केला.

10/11

जर आपण अदिती राव हैदरीच्या कामाबद्दल बोललो तर तिने तिच्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलंय. आदितीने 'दिल्ली 6' मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर तिने 'मर्डर 3', 'रॉकस्टार', 'फितूर' आणि 'पद्मावत' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने बहुतेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये साईड रोल्स केले आहेत.

11/11

संजय लीला भन्साळी यांच्या हीरा मंडीमध्ये देखील अभिनेत्री उकृष्ट अभिनय केला, ज्यामध्ये तिने बिब्बोजनची भूमिका साकारली होती. यासोबतच तिने दीपिका पदुकोणच्या पद्मावतमध्येही दमदार अभिनय केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 60 ते 65 कोटी रुपये आहे.