GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झी २४ तास वर, पाहा यामध्ये तुमचाही बाप्पा दिसतोय का

Sep 27, 2023, 16:56 PM IST
1/9

सुशांत चंद्रकांत शिंदे. काळाचौकी

आकर्षक रोशणाईने सजावट केलेल्या दत्तमहाराजांच्या समोर काळाचौकीच्या सुशांत चंद्रकांत शिंदे यांचा लाडका गणपती बाप्पा अगदी मनमोहक दिसत आहे   

2/9

प्रसाद विंगळे, नाशिक

नाशिकच्या प्रसाद विंगळे यांचा बाप्पा दोन गौरायांच्या मध्ये अगदी थाटात बसला आहे.   

3/9

प्रताप सोनवणे, देविदास कॉलनी ,जळगांव

जळगावच्या प्रताप सोनवणेंनी यंदा चांद्रयान-3 चा अनोखा देखावा केला आहे. यामध्ये बाप्पाची मूर्ती ही खुप सुंदर दिसत आहे.   

4/9

देवश्री चंद्रकांत आग्रे, नायगाव

देवश्री चंद्रकांत आग्रे यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले आहे. सुंदर सजावट करत त्यांनी  कोल्हापूरच्या अंबाबाईचा देखावा केला आणि बाप्पाचे स्वागत केले. 

5/9

प्रथमेश रविंद्र धोत्रे. मुरबाड, जिल्हा ठाणे

मुरबाड येथील प्रथमेश धोत्रेंनी बाप्पाचे स्वागत केले. खास नारळात बसलेला बाप्पा असा देखावा त्यांनी साकारला. 

6/9

शालवक संदीप विरखरे, जोगेश्वरी

शालवक संदीप विरखरे यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. लाडक्या गणरायासाठी त्यांनी आकर्षक आरास केलीय.  

7/9

शशीकांत पन्हाळे, नायगाव, मुंबई

नायगावातील शशिकांत पन्हाळे यांच्या बाप्पाचे मनमोहक रूप.   

8/9

सुरेंद्र, शैलेंद्र, मंगेश पाटील, परळ, मुंबई

पाटील परिवाराने केलेल्या फुलांच्या सजावटीने बाप्पाचे रूप आणखी खुलून आले आहे. 

9/9

अनुश्रुत आणि अनुस्मित चौधरी, नागपूर

नागपूरच्या अनुश्रुत आणि अनुस्मित या दोन चिमुकल्यांनी बाप्पाची स्थापना अगदी उत्साहात केली.