चाहत्यांसाठी Good News! भारत-पाकिस्तानमध्ये दरवर्षी मालिका? गांधी-जिन्नांशी खास कनेक्शन

India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊयात सध्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये नेमकी काय चर्चा सुरु आहे आणि याचा काय परिणाम होईल.

Swapnil Ghangale | Oct 03, 2023, 15:37 PM IST
1/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

तुम्ही क्रिकेट चाहते असाल तर ही बातमी वाचून नक्कीच तुम्हाला अधिक आनंद होईल यात शंका नाही. जाणून घ्या नेमकं हे प्रकरण आहे तरी काय...

2/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

भारतामध्ये 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय सामन्यांची वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

3/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

तसं भारत पाकिस्तान सामना म्हटलं की भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची उत्साह शिगेला असतो. तसाच काहीसा प्रकार वर्ल्डकपच्या सामन्यासंदर्भातही दिसून येत आहे.

4/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

एकीकडे भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या या सामन्याची चर्चा असतानाच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाला म्हणजेच बीसीसीआयला एक प्रस्ताव दिला आहे.

5/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

पीसीबीने भारत आणि पाकिस्तानदरम्यान दरवर्षी द्विपक्षीय मालिकेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयला दिला आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जका अशरफ यांनी सोमवारी स्वत: याची माहिती दिली. 

6/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचं नावही सुचवलं आहे. 'गांधी-जिन्ना ट्रॉफी' नावाखाली ही मालिका खेळवावी असं पाकिस्तानचा प्रस्ताव आहे.

7/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

जका अशरफ यांनी, "मी बीसीसीआयकडे अॅशेज मालिकेप्रमाणे गांधी-जिन्ना ट्रॉफी आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या मालिकेसाठी दोन्ही देश आलटून पालटून एकमेकांकडे सामने खेळण्यासाठी जाऊ शकतात," असं म्हटलं आहे.

8/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2014 नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. नुकत्याच झालेल्या आशिया चषक 2023 च्या स्पर्धेत हे दोन्ही संघ 2 वेळा आमने-सामने आले होते.

9/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

भारत आणि पाकिस्तानचे संघ मागील 9 वर्षांमध्ये केवळ वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक स्पर्धांमध्ये एकमेकांविरोधात खेळताना दिसतात. 

10/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

भारत आणि पाकिस्तानचा संघ अशाप्रकारे एकमेकांसमोर येतात तेव्हा चाहत्यांसाठी ती पर्वणीच असते. दोन्ही क्रिकेट बोर्डांनाही याचा फायदा होतो.

11/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

यापूर्वी पाकिस्तानने आयसीसी स्पर्धांबरोबरच भारत आणि पाकिस्तानदरम्यान मालिका खेळवण्याचा प्रस्ताव दिले आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनीही मागील वर्षी ट्राय सिरीज खेळवण्याचा प्रस्ताव दिला होता.

12/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

भारत आणि पाकिस्तानचे संघ तिसऱ्या कोणत्या तरी देशामध्ये सामने खेळतील असं रमीज राजा यांनी त्यांच्या प्रस्तावामध्ये म्हटलं होतं.

13/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

सध्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. पाकिस्तानचा संघ काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये दाखल झाला आहे. याच ठिकाणी स्पर्धेतील पहिले 2 सामने खेळणार आहे.

14/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

वर्ल्डकपसाठी पाकिस्तानी संघ भारतात आला असून तब्बल 7 वर्षांनंतर शेजारच्या संघाने भारतीय भूमीत पाऊल ठेवलं आहे.

15/15

Gandhi Jinnah Trophy Annual India Pakistan Bilateral Series

आता बीसीसीआय पाकिस्तानी क्रिकेट बोर्डांच्या अध्यक्षांचा हा प्रस्ताव स्वीकारतात का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं झालं तर ही मालिका भारत आणि पाकिस्तानी चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी ठरेल यात शंका नाही.