वाहतूक नियम पाळा, 35 कोटी रुपयांची बक्षिसं जिंका
वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करणा-या वाहनचालकांना आता चक्क बक्षीस दिलं जाणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियम पाळावेत, यासाठी हा नवा प्रयोग राबवला जात आहे.
Nagpur Traffic Police : वाहतूक नियमांचं उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई होते. मात्र, वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणा-यांचं काय? अशा सुजाण आणि जबाबदार वाहनचालकांना आता चक्क बक्षिसं दिली जाणार आहेत. होय, वाहतुकीचे नियम पाळा आणि बक्षीस मिळवा अशी नवी योजना उपराजधानी नागपुरात सुरू झाली आहे.
1/7

3/7

4/7
