PHOTO : 17व्या वर्षी पहिलं लग्न, 40व्या वर्षी झाली आई; आता 47 व्या प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात

Entertainment : या अभिनेत्रीने केवळ तिच्या ऑन स्क्रीन पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिली. वयाच्या 17व्या वर्षी तिने पहिलं लग्न केलं आता वयाच्या 47 व्या वर्षी ती दुसरं लग्न करणार आहे. 

| Jan 06, 2025, 15:00 PM IST
1/8

आम्ही बोलत आहोत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माही गिल हिच्याबद्दल. बोल्ड आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध आहे. देव डी या चित्रपटातून माहीला खरी ओळख मिळाली. 

2/8

माहीने वयाच्या 17 व्या वर्षी पहिलं लग्न केलं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. तिने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

3/8

अभिनेत्री फॅमिली ऑफ ठाकूरगंज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिने नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, लग्नापूर्वीच तिला एक मुलगी झाली आहे. तर ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहते. 

4/8

अभिनेत्रीने अजून लग्न केलं नाहीय. ती म्हणाली की, जेव्हा मला लग्न करायचं आहे, तेव्हा मी करेन. तिचं नाव वेरोनिका असून ती 5 वर्षांची आहे. 

5/8

पुढे ती म्हणाली की, माझा एक बॉयफ्रेंड असून तो कॅथलिक नाही तर तो एक व्यापारी आहे.   

6/8

2019 मध्ये माही गिलला रवि केसरसोबत पाहिलं गेलं होतं आणि त्यावेळी दोघांच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत सुरू झाल्या होत्या. दरम्यान, 2023 मध्ये माही गिलनं हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत रवि केसरसोबत तिनं आपली लग्नगाठ बांधल्याचं जाहीर केलं होतं.

7/8

माही गिलने 2003 मध्ये अमितोज मान दिग्दर्शित 'हवाईन' चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. जिथे तिने बब्बू मान सोबत काम केलं. गेल्या काही वर्षांत देव.डी, नॉट अ लव्ह स्टोरी, साहिब बीवी और गँगस्टर, पान सिंग तोमर आणि तुफान यासारख्या उल्लेखनीय चित्रपटांद्वारे तिला ओळख मिळाली. 

8/8

माही गिल पुढे महेश मांजरेकर यांच्या 1962: द वॉर इन द हिल्समध्ये अभय देओल, सुमीत व्यास आणि आकाश ठोसर यांच्यासोबत दिसणार आहे .