सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन! एंटरटेंनमेंटचा धमाका... या विकेंडला पाहा हे चित्रपट आणि वेबसीरिज
Entertainment : या विकेंडला कोणता चित्रपट (Movie) किंवा वेबसीरिज (Web Series) पाहिची हे जर तुम्ही ठरवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात ओटीटी (OTT) आणि चित्रपटगृहात दमदार वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सस्पेन्स, थ्रिलर, अॅक्शनने भरपूर असलेल्या या वेबसीरिज आणि चित्रपट तुमचा विकेंड आणखी धमाकेदार करणार आहे.
राजीव कासले
| Sep 08, 2023, 20:57 PM IST
1/7
2/7
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा 'जवान' चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर तब्बल 129.6 इतकी रेकॉर्डब्रेक कमाई जवानने केली आहे. अॅक्शन आणि शाहरुख खानचा दमदार अभिनय पाहायचा असेल तर या विकेंडला जवान हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. पण यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावं लागेल.
3/7
4/7
एंटरटेंनमेंटचा आणखी एक धमाका पाहिला मिळणार तो म्हणजे डिज्नी प्लस हॉटस्टारवर. डिज्नीवर 'द फ्रीलांसर' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. सीरियामध्ये फसलेल्या एका मुलीवर या मालिकेची कहाणी आधारित आहे. फसवणूक करुन या मुलीचं लग्न लावलं जातं आणि तिला सीरियाला नेऊन बंधक बनवलं जातं. एक फ्रीलांसर या मुलीची तिथून सुटका करतो.
5/7
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा ओटीटीवर पुन्हा एकदा दमदार अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. झी5 वर 'हड्डी' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली असून एका ट्रान्सजेंडरची यात कहाणी आहे. एक तरुण लिंगबदल शस्त्रक्रिया करुन हरीचा हरीका होतो. पण ज्या दिवशी हरीकाचं लग्न असतं त्यादिवशी किन्नर समाजातील त्याचे काही शत्रू येऊन त्याचं स्वप्न उद्ध्वस्त करतात. याचा बदला हरीका कसा घेते हे पाहाणं खूपच सप्सेन्स आहे.
6/7
7/7