जेवणाबरोबर कच्चा कांदा खात असाल तर हे वाचाच! वेळीच सावध व्हा कारण...

Eat Raw Onions: अगदी हॉटेल असो किंवा घरचं जेवण असो आपल्यापैकी अनेकजण जेवताना कच्चा कांदा आवर्जून खातात. कधी सॅलेडमध्ये तर कधी नुसता कच्चा कांदा तोंडी लावताना खाणारे अनेकजण आहेत. मात्र कच्च्या कांद्यासंदर्भातील काही गोष्टी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील. त्याचबद्दल...

| Jan 18, 2025, 14:03 PM IST
1/12

cutonion

कच्चा कांदा सर्वांसाठी लाभदायक नसतो हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. कच्चा कांदा कोणी खावा आणि कोणी खाऊ नये जाणून घेऊयात...

2/12

cutonion

छान हिरवीगार काकडी, लाल टोमॅटो, त्याहून लाल बीट अन् कांदा असं सॅलेड असेल तर जेवणातले चार घास जास्तच जातात, असा अनुभव तुम्हीही घेतला असेल.

3/12

cutonion

आरोग्याला फायद्याचं असणाऱ्या या सॅलेडमधील कांदा हा अत्यंत महत्त्वाचा घटक. मात्र रोज कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरावर काही दुष्पपरिणाम होतात असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्याचा धक्का बसले, पण हे खरं आहे.

4/12

cutonion

कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण असणारी संयुगे आणि क्वार्सेटीन्स असतात. कांद्यामधील अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरामधील पेशींचे संरक्षण करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी फायद्याची ठरतात. तर कांद्यातील ऑक्सिडेटिव्ह आपल्याला तणावाचा सामना करण्यास मदत करतात.  

5/12

cutonion

कांद्यातील सल्फरची संयुगांमुळे हृदयाचं संरक्षण करणारे घटक असतात. तसेच यामुळे रक्तदाब सुरळीत राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या घटकांमुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत.

6/12

cutonion

कांद्यामधील संयुगे आणि क्वार्सेटीन्स तसेच क्रोमियन मिनरल्समुळे शरीरामधील इन्स्युलीनची सेन्सीटीव्हीटी कायम ठेवतात. तसेच इन्स्युलीनला असणारा विरोध नियंत्रित करतात. 

7/12

cutonion

कांदा खाल्ल्याने शरीरामधील गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात. यामुळे आतड्याचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळेच पचनासंदर्भातील समस्या होत नाहीत. 

8/12

cutonion

मात्र कांदा हा सर्वांनाच आरोग्यदायी आणि फलदायी ठरतो असं नाही. कांदा पचवण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. म्हणूनच ज्यांना कांदाच पचवता येत नाही त्यांच्यासाठी तो धोकादायक ठरु शकतो.

9/12

cutonion

कांदा न पचणाऱ्यांना कांदा खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं, पोटात गॅस होणं, छातीत जळजळ होणं यासारख्या समस्या जाणवतात. काही जणांना पोटदुखीची समस्या जाणवते. अशा लोकांना कच्चा कांदा खाणं टाळावं.

10/12

cutonion

कांद्यामुळे रक्त पातळ राहण्यास मदत होते आणि रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. मात्र जे लोक आधीपासूनच रक्त पातळ राहण्यासाठी औषधं घेत असतील तर त्यांनी कांद्याबद्दल त्यांच्या डाएटीशीअनकडून सल्ला घ्यावा.

11/12

cutonion

मात्र कांदा पचत असलेल्यांनी दिवसाला एक किंवा अर्धा कांदा खाल्ला पाहिजे, असं आहार तज्ज्ञ सांगतात. मात्र हे करताना आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही ते सांगतात.

12/12

cutonion

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)