पावसाळ्यात अस्थमाच्या रुग्णांनी 'अशी' काळजी घ्यावी

पावसाळ्यात थंड वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. पावसाळ्यात अस्थमा आणि श्वसनाचे आजार यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 

Jul 26, 2024, 13:26 PM IST
1/7

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दमा असलेल्या रूग्णांसाठी पावसाळा धोकादायक ठरू शकतो.

2/7

पावसाळ्यात आर्द्रता वाढते त्यामुळे बुरशीची वाढ होते. यामुळे दमा वाढू लागतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.   

3/7

पावसामुळे वातावरणात सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडसारखे वायू वाढतात त्यामुळे प्रदूषण वाढते. हे प्रदूषण दम्याच्या रूग्णांसाठी घातक ठरू शकते. 

4/7

सोबत इन्हेलर ठेवा

पावसाळ्यात थंडी आणि आर्द्रतेमुळे दम्याचा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी सोबत इन्हेलर ठेवावे. 

5/7

सर्दी-खोकला

दम्याच्या रुग्णांनी सर्दी खोकला या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे दम्याचा झटका येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

6/7

घरातील रोप

घरात ठेवलेली रोप पावसाळ्यात बाहेर ठेवावीत. या रोपांमुळे दम्याच्या रूग्णांना त्रास होऊ शकतो.

7/7

आहार

दम्याच्या रुग्णांनी पावसाळ्यात गरम पाणी प्यावे. त्याचबरोबर आहारात हिरव्या भाज्यांचा समवेश करावा. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे.  'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)