Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला करा या वस्तूंचं दान, ग्रहदोषातून होईल सुटका

Makar Sankranti 2023: 14 जानेवारीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मात्र उदयतिथीनुसार मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल. मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचं महत्त्व आहे. या दिवशी तीळगुळ खाणं तसेच त्याचं दान करणं फलदायी ठरतं. चला जाणून घेऊयात आणखी कोणत्या वस्तूंचं दान केलं की, ग्रहदोष दूर होतो.

Jan 09, 2023, 18:59 PM IST
1/5

makar sankranti 2023

मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असंही संबोधलं जातं. तीळाचं दान केल्यास फलदायी ठरतं. यामुळे शनिदोष दूर होतो. या व्यतिरिक्त भगवान विष्णु, सूर्य आणि शनिदेवाची पूजा केल्यास इच्छित फळ मिळतं.

2/5

makar sankranti 2023

मकर संक्रांतीला गरीब गरजू व्यक्तींना घोंगडी, चादर किंवा गोधडी दिल्यास राहु दोष दूर होतो. काळ्या रंगांची घोंगडी किंवा गोधडी दिल्यास फळ मिळतं.   

3/5

makar sankranti 2023

गूळ हे गुरु ग्रहाशी संबंधित आहे. मकर संक्रांती यंदा गुरुवारी येत आहे. त्यामुळे गुरु ग्रह कमकुवत असल्यास गुळाचं दान केल्यास फायदा होईल. जीवनात सुख समृद्धी येईल.

4/5

makar sankranti 2023

मकर संक्रांतीली खिचडी दानाचं महत्त्व आहे. या पर्वाला खिचडी संक्राती संबोधलं जातं. खिचडीत तांदूळ, उडद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. हे पदार्थ शनि, बुध, सूर्य आणि चंद्राशी निगडीत आहेत. या दिवशी खिचडी खाणं किंवा दान करणं लाभकारक ठरतं.

5/5

makar sankranti 2023

मकर संक्रांतीला तूप दान करणं शुभ ठरतं. तूप सूर्य आणि गुरु ग्रहाशी निगडीत आहे. तसेच मकर संक्रांती सूर्याची उपासना करण्याचा दिवस आहे. तुपाच्या दानामुळे सूर्य आणि गुरु ग्रह मजबूत होतो.