'देतो तो देव'; सुदृढ आणि निरोगी आरोग्य देणाऱ्या डॉक्टरांना खास शुभेच्छा, अशी करा कृतज्ञता व्यक्त
1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर डे' साजरा केला जातो. माणसातल्या देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. खास शुभेच्छा पाठवून व्यक्त करा कृतज्ञता.
National Doctors Day : 'डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप' म्हटले जाते. देवानंतर माणसाला दुसरे जीवन देणारे डॉक्टरच आहेत. गरजू लोकांना बरे करण्यात आणि त्यांना निरोगी ठेवण्यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. कोविड महामारीच्या काळात त्यांचे योगदान अधिक अधोरेखित झाले. परंतु अनेक वेळा आपण त्यांचे आभार मानायला विसरतो. 'डॉक्टर्स डे' आम्हाला डॉक्टरांचे त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल आभार मानण्याची संधी देतो.
'राष्ट्रीय डॉक्टर दिन' दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. भारतात हा दिवस पहिल्यांदा 1991 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा करण्याचे एक खास कारण म्हणजे आज महान डॉक्टर डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी पाटणा, बिहार येथे झाला.