'देवमाणूस' : सोशल मीडियावर सरू आजींच्या म्हणीचा धुमाकूळ
रूक्मिणी सुतार साकारतात सरू आजी
Dakshata Thasale
| Nov 25, 2020, 12:49 PM IST
मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) सध्याची लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' (Devmanus)चर्चेत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र वेगळं आहे. पण या सगळ्यात भाव खावून जात आहे ती 'सरू आजी'. दिसत नसलं तरीही सरू आजी वाड्याची काळजी घेताना दिसते. सरू आजीची (Saru Aaji) भूमिका रुक्मिणी सुतार (Rukamini Sutar) साकारत आहेत. या आजींनी प्रत्येकाला आपल्या अभिनयातून आनंद दिला आहे.
सरू आजी लोकप्रिय झाली याचं मुख्य कारणं तिच्या म्हणी... सरू आजीच्या म्हणींना धुमाकूळ घातला आहे. सरू आजींच्या म्हणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.