रेल्वेचा शाही थाट! डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 पुन्हा धावण्यासाठी सज्ज; मुंबईच्या CSMT स्टेशनवरुन होणार शुभारंभ
डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही देशातील सर्वात महागडी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये शाही सुविधा मिळतात.
Devendra Kolhatkar
| Sep 20, 2023, 23:37 PM IST
Deccan Odyssey Train: देशातल्या शाही रेल्वेंपैकी एक असलेली डेक्कन ओडिसी आता पुन्हा ट्रॅकवर धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथून शुभारंभ होणार आहे.
1/7

2/7

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
3/7
