Datta Jayanti 2024 Wishes : दत्त दत्त ऐसे लागले ध्यान…! श्रीदत्त जयंतीनिमित्त प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा

Datta Jayanti 2024 Wishes In Marathi : पौर्णिमा तिथी ही 14 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2.33 वाजपर्यंत असणार आहे. दत्त जयंती ही पौर्णिमा तिथीला आणि संध्याकाळी साजरी करण्यात येते. म्हणून 14 डिसेंबरला दत्त जयंतीचा उत्साह असणार आहे. अशा या शुभदिनाच्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या. 

| Dec 14, 2024, 11:12 AM IST
1/7

धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2/7

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले, मला ते दत्तगुरु दिसले, श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

3/7

ज्याच्या ह्रदयात गुरु मूर्ती त्याची होई जगभरात किर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होईल वजा , दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

4/7

शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार कितीही अडथळे आले तरी आम्ही माणनार नाही हार दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

5/7

दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/7

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा! दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा

7/7

 ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, समृद्धी,शांती तुमच्या जीवनी वसो, दत्ता चरणी ही प्रार्थना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा