IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला 'जोर का झटका', हा स्टार गोलंदाज प्लेऑफच्या तोंडावर आयपीएलमधून बाहेर

Mathisha Pathirana returns to Sri Lanka :चेन्नई सुपर किंग्जला आता तिसरा धक्का बसला आहे. धोनीचा प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे.

Saurabh Talekar | May 05, 2024, 17:34 PM IST

IPL 2024, Chennai Super Kings : पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने मथिशा पाथिरानाला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावर चेन्नईने उत्तर दिलंय.

1/7

चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चहर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. अशातच चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत.

2/7

तर चहरनंतर मुस्ताफिझूर रहमना देखील बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

3/7

अशातच आता संघात गोलंदाजांची कमतरता असताना आता चेन्नईला धक्क्यावर धक्के बसले आहेत. 

4/7

चेन्नईचा स्टार गोलंदाज मथिशा पाथिराना देखील श्रीलंकेला परतल्याची माहिती समोर आली आहे.

5/7

पाथिरानाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे,अशी माहिती चेन्नई सुपर किंग्जने निवेदन जाहीर करताना दिली आहे.

6/7

पाथिरानाने यंदाच्या हंगामात चांगली गोलंदाजी केलीये. त्याने 6 सामन्यात 13 विकेट्स नावावर केल्यात आहेत.

7/7

दरम्यान, चेन्नईकडे आता गोलंदाजीत खुप कमी पर्याय उरला आहे. शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि रिचर्ड ग्लीसन यांना चेन्नईला खेळवावं लागतंय.