PHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोहोचला विक्की कौशल रायगडावर; म्हणाला, ‘यापेक्षा चांगली संधी...’

Vicky Kaushal At Raigad Fort: 'छावा'मध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने ते रायगड किल्ल्यावर पोहोचले आहेत.

नेहा चौधरी | Feb 19, 2025, 18:45 PM IST
1/8

विक्की कौशलने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची भूमिका साकारून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आज शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रायगड किल्ल्यावर पोहोचला आणि त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाला. 

2/8

विक्की कौशल खास मराठमोळ्या लूक म्हणजे ‘छावा’ वेशभूषेत रायगड किल्ल्यावर आला होता. अभिनेत्याने ऑफ व्हाइट कुर्ता आणि मॅचिंग कमर कोटसोबत फेटा बांधला होता.

3/8

यावेळी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अभिनेता नतमस्तक झाला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. 

4/8

विक्की कौशलसोबत यावेळी निर्माता दिनेश विजन आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हेही उपस्थितीत होते. यावेळी सरकारकडून रायगडावर भव्य तयारी करण्यात आली होती. 

5/8

रायगडावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांनी अभिनेता विक्की कौशलचं स्वागत केलं. 

6/8

यावेळी अभिनेता आणि दिनेश विजन याने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तिथे फोटो काढले आहेत.

7/8

हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेता म्हणाला की, आज छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त मला रायगड किल्ल्यावर आदरांजली वाहण्याचा सौभाग्य मिळाला. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. महाराजांचं आशीवार्द घेण्यासाठी यापेक्षा चांगला काळ असूच शकत नाही. 

8/8

अभिनेता पुढे म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय शंभू.