जन्माच्या आधी 'या' 5 गोष्टी ठरलेल्या असतात, लाख प्रयत्न करुनही तुम्ही बदलू शकत नाही

Acharya Chanakya Niti News : चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याप्रमाणे तुम्ही आचरण केले तर त्याचा फायदा होईल. आचार्य चाणक्य यांनी आपल्या शास्त्रांमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने त्या व्यक्तीला कोणीही रोखू शकत नाही. ते नेहमी यशस्वी होतात. तसेच आचार्य नीतींनी अशा गोष्टींबद्दल सांगितलं आहे, ज्या माणसाच्या जन्मापूर्वी लिहून ठेवल्या जातात आणि खूप प्रयत्न करुनही त्यापासून सुटका होत नाही. 

Jun 08, 2023, 14:39 PM IST
1/5

आचार्य चाणक्य नितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, एखाद्या व्यक्तीचे वय आईच्या पोटातच लिहिले जाते, तो किती काळ जगेल आणि त्याचा मृत्यू कधी आहे ते?

2/5

तुमची कर्मे तुमच्या मागील जन्मावर अवलंबून असतात. आणि जन्म घेतल्यानंतर त्या कर्माचे बरे-वाईट त्याला भोगावेच लागते, असे आचार्य चाणक्य सांगतात.

3/5

चाणक्य नितीनुसार व्यक्ती किती ज्ञान प्राप्त करेल. हे त्याच्या जन्मावरुनही ठरते. तुमची कितीही इच्छा असली तरी शिक्षण तुमच्या नशिबात नसेल तर ते तुम्हाला मिळणार नाही.

4/5

आचार्य चाणक्य निती शास्त्रात सांगितले आहे, तुमची आर्थिक स्थितीही तुमच्या जन्मावरुन ठरते. माणसाला कितीही मेहनत केली तरी नशिबापेक्षा जास्त पैसा मिळणार नाही. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या पैशावर समाधानी असले पाहिजे.

5/5

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की माणसाने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. कारण वाईट कर्मांचे फळही पुढच्या जन्मी मिळते. माणसाचा मृत्यूही त्याच्या जन्मापूर्वीच निश्चित होतो.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)